Chhatrapati Sambhajinagar ZP Result: अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
अब्दुल सत्तार यांनी मोठा मुलगा समीर सत्तार याला नगराध्यक्ष केलं आता थोरल्या अमीर सत्तारला जिल्हा परिषदेत निवडून आणलं आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar ZP election result: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत अंभई गटातून आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल अमीर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा सत्तार कुटुंबाची राजकीय पकड असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाल आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी नव्याने तयार केलेल्या अंभई गटातून आपल्या दुसऱ्या मुलाचे राजकीय लॉन्चिंग करत जिल्हा परिषद निवडणुकीत 'सत्तार फॅक्टर' कायम राखण्याची योजना आखली होती. सत्तार यांनी मोठा मुलगा समीर सत्तार याला नगराध्यक्ष केलं आता थोरल्या अमीर सत्तारला जिल्हा परिषदेत निवडून आणलं आहे.
सत्तारांचा 'थोरला ' जिल्हा परिषदेत विजयी
अंभई गटात झालेल्या चुरशीच्या लढतीत अब्दुल अमीर यांनी भाजपचे उमेदवार त्र्यंबक मारुती गव्हाणे यांचा पराभव केला आहे.अब्दुल अमीर यांनी जवळपास 3435 मतांच्या फरकाने हा विजय संपादन केलाय. हा फरक लक्षवेधी मानला जातोय. मतमोजणी दरम्यान सुरुवातीपासूनच अब्दुल अमीर आघाडीवर होते.
दुसरीकडे सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गटातील शिंदे सेनेचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे दोन सदस्य विजयी झाले आहेत. हळदा गणातून भाजपच्या अनुराधा गवळे यांचा 176 मतांनी विजयी झालाय. तर अजिंठा गटातून शिवसेना आयेशा बेगम नासेर हुसेन सय्यद विजयी झाल्या आहेत .
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आघाडी :
63 / 58
भाजप : 21
शिवसेना : 16
शिवसेना UBT: 10
NCP : 3
NCP SP ; 1
काँग्रेस : 1
वंचित : 00
MIM: 1
अपक्ष : 5
युती -आघाडीची समीकरणे कशी?
-शिवसेना-भाजप युती - 16 ठिकाणी अधिकृत युती
-भाजप-शिवसेना मैत्रीपूर्ण लढत -47 ठिकाणी
-महाविकास आघाडी (उबाठा, काँग्रेस, वंचित): 55 जागा
-(कन्नड तालुक्यातील 8 जागा मैत्रीपूर्ण)
-राष्ट्रवादी (दोन्ही राष्ट्रवादी घडाळ चिन्हावर लढत आहे) : जिल्हा परिषद 40 जागा, पंचायत समिती 82 जागा





















