Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
भाजपनं काल मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे.. मुंबईचं सध्याचं राजकीय समीकरण पाहता ११ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत रितू तावडे या महापौर पदी बिनविरोध निवडूनही येतील.. अधिकृत घोषणेनंतर त्या भाजपच्या पहिल्या महिला महापौरही ठरतील, पण त्या पू्र्वीच रितू तावडे या चर्चेत आल्या आहेत.. त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे..त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईचं राजकीय वातावरण तापलं आहे.. घेऊयात यासंदर्भातला आढावा..
महापौरपदासाठी नावाची घोषणा होता..
रितू तावडेंनी पहिल्याच पत्रकार परिषदेत..
आपला अजेंडाच स्पष्ट केला.
बाईट- रितू तावडे, मुंबई महापौरपदाच्या उमेदवार ((बांगलादेशीवरचा))
व्ही.ओ - आता पहिल्याच चेंडूवर असा फटका मारल्यानंतर..
समोरच्या संघातूनही तसाच पलटवार येणारच होता..
त्यातही समोरचा संघाचा दारुण पराभव करत..
रितू तावडेंच्या भाजपनं चार दशकानंतर मुंबई महापालिकेवर भगवा फडवलाय..
त्यामुळे त्याच पराभवाचा वचपा काढण्याची संधी
ठाकरेंच्या शिवसेनेला तावडेंच्या वक्तव्यानं मिळाली...
राऊतांनी बांगलादेशसंदर्भातलं वक्तव्य करत...
मोदींना टार्गेट केलं..
पण, याच वक्तव्यानंतर त्यांनी रितू तावडेंना काही सवालही विचारले..
All Shows


































