Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेवरून दोन्ही पक्षात असणारी मतभिन्नता गेल्या काही दिवसांत समोर येतेय. मात्र त्याचवेळी पवार कुटुंबीयांमध्ये असणारे नात्याचे बंध मात्र आजही तितकेच घट्ट असल्याचं चित्र दिसतंय. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या बारामतीतल्या सहयोग सोसायटीत सांत्वनासाठी येणाऱ्यांची रिघ लागलीय. इथं अजित पवारांच्या कुटुंबीयांसोबत स्वतः शरद पवारही सातत्यानं हजर असल्याचं दिसतं. याच सहयोग सोसायटीतला पार्थ पवार आणि शरद पवारांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चेला नवा विषय मिळाला. बघूया, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
आजोबा आणि नातू एकमेकांशी चर्चा करताना हा फोटो सध्या राजकीय वर्तुळात शेअर होतोय.
वडिलांच्या अकाली निधनाचं दुःख पचवणारे पार्थ पवार आणि पुतण्याच्या अपघाती निधनानं बसलेला धक्का सावरणारे शरद पवार दोघंही गेले काही दिवस सातत्यानं बारामतीच्या सहयोग सोसायटीत बसून असतात.
अजितदादांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दररोज शेकडो लोकांची पावलं या सहयोग सोसायटीकडं वळतात.
त्यांना भेटण्यासाठी अजितदादांच्या कुटुंबीयांसोबत स्वतः शरद पवारही हजर असतात.
याच दरम्यान टिपलेला हा फोटो.
पार्थ पवारांसोबत चर्चा करत असताना तिथं रोहित पवारही आले आणि त्यानंतर दोन्ही नातवांसोबतचा शरद पवारांचा हा फोटोही समोर आला.
अर्थात, नात्याच्या पलिकडं जाऊन या फोटोवरून राजकीय चर्चा सुरु झाली.
मात्र सध्या तरी पवार कुटुंबीयांमध्ये काहीही राजकीय सुरु नसल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलंय.
All Shows


































