Saif Ali Khan: 'मुलाचं नाव राम ठेवू शकत नाही...' ; सैफच्या जुन्या व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
'बॉयकॉट विक्रम वेधा' असा हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
Vikram Vedha: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) विक्रम वेधा (Vikram Vedha) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो विक्रम ही भूमिका साकारणार आहे. सध्या एका जुन्या व्हिडीओमुळे सध्या नेटकरी सैफला ट्रोल करत आहेत. तसेच 'बॉयकॉट विक्रम वेधा' असा हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंड होत आहे. सैफच्या या व्हायरल व्हिडीओचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होईल का? असा प्रश्न सध्या सैफच्या चाहत्यांना पडला आहे.
सैफचा व्हायरल व्हिडीओ
'मी माझ्या मुलाचे नाव राम आणि अलेक्झांडर असे ठेवू शकत नाही. त्यामुळे मी मुस्लिम नाव का ठेवू नये?' असं व्हिडीओमध्ये सैफ म्हणताना दिसत आहे. तर पुढे व्हिडीओमध्ये दिसते की, करिना कपूर ही एका शोमध्ये तैमूर या नवाचा अर्थ सांगताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे सध्या सैफच्या विक्रम वेधा या चित्रपटाला नेटकरी बॉयकॉट करत आहे.
पाहा व्हिडीओ
The reality of #Karachiwood actor/actress #SaifAliKhan and #KareenaKhan pic.twitter.com/zDFfYkcVO1
— Baba Banaras™ (@RealBababanaras) September 28, 2022
करीना आणि सैफनं 2012 साली लग्नगाठ बांधली. 2016 साली तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2021 रोजी जहांगिरचा जन्म झाला. 'जेह' हे जहांगिरचे टोपण नाव आहे. तर सैफ आणि अमृता सिंह यांमा सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.
'विक्रम वेधा' या अॅक्शन-थ्रीलरचे लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केलं आहे. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट 30 सप्टेंबरला चित्रपटगृहात रिलीज आहे भारताव्यतिरिक्त, उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या मोठ्या देशांमध्ये ‘विक्रम वेधा’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हा चित्रपट युरोपातील 22 आणि आफ्रिकेतील 27 देशांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी विक्रम वेधा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या ट्रेलरमधील परफॉर्मन्ससाठी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात रोहित सराफ, योगिता बिहानी, शरीब हाश्मी आणि सत्यदीप मिश्रा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: