एक्स्प्लोर
विद्या बालनच्या 'कहानी 2' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

मुंबई : अभिनेत्री विद्या बालनच्या 'कहानी 2 : दुर्गा रानी सिंह'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये विद्या बालन अतिशय दमदार दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टरही जारी केल होतं.
हा सिनेमा 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या कहानीचा सिक्वेल आहे. 'कहानी'मध्ये विद्याने तिच्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतला होता. तर 'कहानी 2 : दुर्गा रानी सिंह'मध्ये ती मुलीसाठी झगडताना दिसच आहे.
'कहानी 2 : दुर्गा रानी सिंह' या चित्रपटात विद्या 'वॉण्टेड क्रिमिनल'च्या भूमिकेत दिसणार आहे. अपहरण आणि हत्याच्या आरोपात पोलिस विद्याच्या मागावर आहेत. सुजॉय घोष दिग्दर्शित या सिनेमात विद्यासह अर्जुन रामपाल आणि जुगल हंसराज प्रमुख भूमिकेत आहेत.
चित्रपटाचा ट्रेलर उत्तम आहे. विद्याचा अभिनय जबरदस्त आहे. कहानी 2 हा 'कहानी'प्रमाणेच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, असं ट्रेलरवरुन वाटत आहे.
'कहानी 2 : दुर्गा रानी सिंह' 2 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. सुरुवातीला 25 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार होता. परंतु निर्माता जयंतीलाल गाडा यांनी बॉक्स ऑफिसवरील लढाईपासून वाचण्यासाठी सिनेमाच्या प्रदर्शन तारीख बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गौरी शिंदे दिग्दर्शित 'डियर जिंदगी' 25 नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.
पाहा ट्रेलर
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
Advertisement
Advertisement
























