Urvashi Rautela : लूंगी आणि क्रॉप टॉप; भन्नाट लूक करून उर्वशी निघाली शॉपिंगला, नेटकऱ्यांनी केले ट्रोल
Urvashi Rautela : व्हिडिओमध्ये उर्वशी निळा क्रॉप टॉप आणि लूंगी अशा लूकमध्ये दिसत आहे.

Urvashi Rautela : आपल्या ग्लॅमरस लूकने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. उर्वशी वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच उर्वशीने एक व्हिडाओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती निळा क्रॉप टॉप आणि लूंगी अशा लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला उर्वशीने कॅप्शन दिले, 'लुंगी व्हेकेशन, लुंगी वन साइज फिट्स ऑल'. या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
उर्वशीच्या लूंगी आणि क्रॉप टॉप या लूकला अनेकांनी ट्रोल केले आहे. या व्हिडीओमध्ये उर्वशी शिंकताना दिसते. त्यामुळे एका नेटकऱ्याने, 'कोरोना झाला आहे का?', अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत लिहीले, 'हे काय सुरू आहे' उर्वशीच्या या व्हिडीओला 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
View this post on Instagram
'सिंह साहब द ग्रेट' या चित्रपटामधून उर्वशीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सनम रे, ग्रँड मस्ती आणि हेट स्टोरी 4 या चित्रपटांमधील उर्वशीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 'मिस डीवा यूनिवर्स 2015' या स्पर्धेत उर्वशी विजयी ठरली होती. लवकरच तिचा 'ब्लॅक रोज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच उर्वशी 'इंस्पेक्टर अविनाश' या वेब सीरिजमध्ये देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेता रणदीप हुड्डा महत्वाची भूमिका साकारणार आहे.
संबंधित बातम्या























