एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उडता पंजाबला 'आप'चं फंडिंग, सेन्सॉर बोर्ड अध्यक्षांचा आरोप
नवी दिल्लीः उडता पंजाब या चित्रपटातील 89 दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावण्याची अट घातल्यानंतर निर्माता अनुराग कश्यप यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे उडता पंजाब हा सिनेमा बनवण्यासाठी आम आदमी पक्षाने पुरवले आहेत, असा गंभीर आरोप सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहेलाज निहलानी यांनी केला आहे.
उडता पंजाब चित्रपटावर सरकार जाणीवपूर्क कात्री लावत आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणुक होणार आहे. त्या दृष्टीने आप पक्षाने या वादात उडी घेतल्याचं बोललं जात आहे. केजरीवाल यांनी नुकतंच अनुराग कश्यप यांचं सिनेमासाठी समर्थन देखील केलं आहे. आप पक्ष पंजाबमधील ड्रग्जच्या समस्येवर निवडणूक लढवणार आहे, आणि हा सिनेमा देखील ड्रग्जच्या समस्येवर आधारित आहे.
सेन्सॉर बोर्डाने उडता पंजाब सिनेमात 89 कट सुचवले आहेत. पण निर्मात अनुराग कश्यप यांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. सेन्सॉर बोर्डाने मात्र सांगितलेले दृश्य हटवल्याशिवाय सिनेमाला सेन्सॉर मान्यता मान्यता नसल्याचं सांगितलं आहे.
संबंधित बातम्याः
'उडता पंजाब' सिनेमातील दृश्यांवर बंदी आणून समस्या सुटणार नाही: राहुल गांधी
'उडता पंजाब' सिनेमावरुन देशभरात वादाला पंख
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement