(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Trevor Noah Tour: अभिनेता आणि स्टँड-अप कॉमेडियन ट्रेव्हर नोहची 'ऑफ द रेकॉर्ड टूर' येणार भारतात; 'या' ठिकाणी होणार शो
ट्रेव्हर नोहची 'ऑफ द रेकॉर्ड टूर' (Off The Record Tour India 2023) प्रथमच भारतामध्ये येणार आहे.
Trevor Noah Tour: अभिनेता आणि स्टँड-अप कॉमेडियन ट्रेव्हर नोहचा (Trevor Noah) चाहता वर्ग मोठा आहे. ट्रेव्हर नोह हा त्याच्या 'ऑफ द रेकॉर्ड टूर' चे शो विविध देशांमध्ये करत आहे. ट्रेव्हर नोहची 'ऑफ द रेकॉर्ड टूर' (Off The Record Tour India 2023) प्रथमच भारतामध्ये येणार आहे. 2022 आणि 2023 दरम्यान यूएसए (U.S) आणि युरोपमधील (Europe) कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगाला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ट्रेव्हर नोह हा आशिया दौऱ्याची सुरुवात भारतातून करणार आहे.
भारत दौर्याबाबत बोलताना, ट्रेवर नोह म्हणाला, "मी आयुष्यभर भारताच्या संस्कृतीवर प्रेम केले आहे, आता माझ्या सध्याचा स्टँड-अप कॉमेडी शोचा दौरा भारतामध्ये करण्याचा बहुमान मिळाल्याने मी खूप एक्सायटेड आहे.'
ट्रेव्हर नोह भारतात विविध ठिकाणी परफॉर्म करणार आहे. हे शो कुठे पार पडणार आहेत? याबद्दल जाणून घ्या...
- 22 आणि 24 सप्टेंबर-जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियम, दिल्ली-NCR
- 27 आणि 28 सप्टेंबर -मॅनफो कन्व्हेन्शन सेंटर, बेंगळुरू
- 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर 2023- NSCI डोम, मुंबई
कोण आहे ट्रेव्हर नोह?
ट्रेव्हर नोह हा प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन, अभिनेता, लेखक आहे. त्यानं अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.ब्लॅक पँथर, कमिंग 2 अमेरिका, ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरोवर या चित्रपटांमध्ये ट्रेव्हर नोहनं काम केलं आहे .ट्रेव्हर नोह हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो.ट्रेव्हर नोह हा त्याच्या आगामी प्रोजोक्ट्सची माहिती आणि विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
View this post on Instagram
ट्रेव्हर नोह हा इन्स्टाग्रामवर त्याच्या ‘ऑफ द रेकॉर्ड टूर' ची माहिती देत असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. त्याला इन्स्टाग्रामवर 8.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. आता ट्रेव्हर नोहची ‘ऑफ द रेकॉर्ड टूर' भारतात येत असल्याने त्याचे भारतातील चाहते उत्सुक आहेत.
View this post on Instagram
कोटक व्हाईट आणि व्हाईट रिझर्व्ह क्रेडिट कार्ड असणाऱ्यांना ‘ऑफ द रेकॉर्ड टूर 2023' च्या तिकिटांच्या दरावर सवलत मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Alexx O’Nell: जन्म अमेरिकेचा पण गाजवतोय बॉलिवूड, कोण आहे अॅलेक्स ओनेल? जाणून घ्या अभिनेत्याबद्दल...