एक्स्प्लोर

Tere Bina Teaser | सलमान खानचं नंव गाणं 'तेरे बिना'चा टिझर लॉन्च; जॅकलीन फर्नांडिससोबत रोमॅन्टिक अंदाज

सलमान खानचं नवं गाणं 'तेरे बिना'चा टिझर लॉन्च करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हे गाणं स्वतः सलमानने गायलं असून त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस देखील दिसून येणार आहे.

मुंबई : सलमान खानचं नवं गाणं 'तेरे बिना'चा टिझर लॉन्च झाला आहे. हे गाणं 12 मे रोजी रिलीज करण्यात येणार आहे. या गाण्यामध्ये सलमान खानसोबत जॅकलीन फर्नांडिस दिसून येणार आहे. दरम्यान, जॅकलीन, वलूशा डीसूजा आणि आयुष शर्मा लॉकडाऊनमुळे सलमान खानच्या पनवेलमध्ये असलेल्या फार्महाउसमध्ये थांबले आहेत. नवं गाणं 'तेरे बिना' संदर्भात सलमान खानने वलुशाला लॉकडाऊन इंटव्ह्यू दिला. हा इंटरव्ह्यू जवळपास साडेचार मिनिटांचा आहे. हा व्हिडीओ सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. सलमान खान या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना म्हणाला की, 'एक गाणं कधीपासून माझ्या मनात होतं, त्यानंतर मी विचार केला की, हे गाणं या वेळात लॉन्च करूनच टाकू. चांगली कंपनी आहेच.' याव्यतिरिक्त सलमान पुढे बोलताना म्हणाला की, हे गाणं कोणत्याही चित्रपटासाठी योग्य असेल, त्यामुळे त्याने स्वतः व्यक्तिगत पातळीवर ते लॉन्च करण्याचा प्लान केला.

पाहा सलमान खानच्या गाण्याचा टिझर :

गाण्याबाबत बोलताना सलमान खान इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला की, 'आम्हाल शुटिंग करण्यासाठी जवळपास 4 दिवस लागले, तरिही आम्ही आतापर्यंत या प्रॉपर्टीचा जास्त वापर केला नाही. गाण्यासाठी मला हे प्रेझेंट करण्याची गरज नाही.' हे गाणं स्वतः सलमान खानने गायलं आहे. आता गाणं कधी रिलीज होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

जॅकलीनने तयार केली शॉर्ट फिल्म

जॅकलीन फर्नांजिस लॉकडाऊनमुळे सलमान खानच्या फार्महाऊसवर थांबली आहे. एक दिवसा अगोदर तिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने एका शॉर्ट फिल्मचं नाव दिलं होतं. यामध्ये ती आपल्या रुटिन लाईफला एन्जॉय करताना दिसून आली आहे. हा व्हिडीओ तिने सलमान खानच्या फार्महाऊसवरच शूट केला आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचा दबंग सलमान खान जवळपास आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पनवेल येथील त्याच्या फार्महाउसमध्ये अडकला आहे. सलमान खानच्या पनवेलमधील त्याच फार्म हाऊसमधून काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलमान आपल्या कुटुंबियांसोबत एकत्र येऊन एका स्टोअर रूममधून राशन आणि खाण्या-पिण्याचं काही अत्यावश्यक सामान जवळच उभ्या असणाऱ्या एका बैलगाडीमध्ये ठेवण्यासाठी मदत करत आहे. सलमान खान पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीसाठी धावून आला असून सलमान ज्या फार्महाउसमध्ये राहत आहे. तेथील आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या गरजू लोकांना राशन देऊन सलमानने मदत केली होती.

संबंधित बातम्या : 

Lockdown | गरजूंच्या मदतीसाठी पुन्हा सरसावला सलमान खान, उलिया वंतूर आणि जॅकलीन फर्नांडीस यांचाही सहभाग

'तरडेचा वावर अन् 'राधे'ला पावर!', सलमानसोबत स्क्रिनवर झळकणार प्रवीण तरडे

coronavirus | कोरोनाच्या जनजागृतीसाठी सलमानचे 'प्यार करोना' गाणे रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget