Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Hrithik Roshans Dating App Profile: हृतिक रोशनच्या डेटिंग अॅपवरील स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.

Hrithik Roshan Breakup: अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बऱ्याच काळापासून त्याचं नाव सबा आझादसोबत (Saba Azad) जोडलं जात आहे. दोघांच्या रिलेशनशिपची (Relationship) चर्चा होत असून, दोघेही बऱ्याचदा एकत्र स्पॉट झाले आहेत. आता दोघांच्या ब्रेकअपचीही चर्चा रंगू लागली आहे. खरंतर हृतिक रोशन याचा एक स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. या स्क्रिनशॉटमध्ये हृतिक रोशनचं एका डेटिंग अॅपवर प्रोफाइल (Breakup) दिसत आहे. यात हृतिक रोशनचा फोटोही दिसत आहे. दरम्यान, त्याची नक्की प्रोफाइल आहे की फेक आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. पण सबा आणि हृतिकचं काही बिनसलं आहे का? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हृतिक रोशन पुन्हा सिंगल असल्याची चर्चा (Hrithik Roshans Dating App Profile Goes Viral)
डेटिंग अॅपच्या प्रोफाइलवर हृतिक रोशनचा फोटो दिसत आहे. त्याने ब्लॅक कलरचा टी - शर्ट घातला आहे. डोक्यावर कॅप आहे, आणि हातात मोबाईल आहे. या प्रोफाइलवर अॅक्टर, प्रोड्यूसर, अन् एंटरप्रन्योर असं लिहिलं आहे. यावर हृतिक रोशनचं वय देखील लिहिलं आहे. पण हे स्क्रिनशॉट किंवा प्रोफाइल व्हेरिफाइड दिसत नाहीये. 'राया' अॅपवरील स्क्रिनशॉट सोशल मीडियात व्हायरल होताच, त्याची आणि सबाच्या ब्रेकअपची चर्चा रंगू लागली. दरम्यान, काहींचं असं म्हणणं आहे की, ही प्रोफाइल जूनी देखील असू शकते. दरम्यान, अद्याप हृतिक रोशन किंवा सबा आझाद या दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
काही दिवसांपू्र्वी उर्वशी रौतेलाने एक धक्कादायक दावा केला होता. हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूर यांचे डेटिंग अॅपवर प्रोफाइल असल्याचं तिनं म्हटलं होतं. हृतिक रोशन आणि सबा आझाद हे एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत आहेत. मे 2022 साली दोघे एक कपल म्हणून मीडियासमोर आले होते. यानंतर दोघांनाही बऱ्याचदा एकत्र स्पॉट करण्यात आले. पार्टी असो किंवा फंक्शन दोघांचे एकत्रित फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात.
सबाला हृतिक रोशनच्या फॅमिली फंक्शनलाही स्पॉट करण्यात आले आहे. या कपलला पसंतीही मिळाली आहे. माहितीनुसार, हृतिक रोशन 52 वर्षांचे असून, ते 2 मुलांचे वडील आहेत. 2000 साली त्यांचं सुजैन खानसोबत लग्न झालं होतं. त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. 4 वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांना दोन मुलं आहेत. हृतिक रोशनचं हे लग्न फार काही काळ टिकलं नाही. त्यांचा घटस्फोट झाला. 2014 साली ते वेगळे झाले होते. पण त्यांनी आपल्या मुलांचे संगोपन एकत्र केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























