एक्स्प्लोर

'तरडेचा वावर अन् 'राधे'ला पावर!', सलमानसोबत स्क्रिनवर झळकणार प्रवीण तरडे

गेल्या काही महिन्यांपासून प्रवीण आणि सलमान भेट घेत आहेत. मुळशी पॅटर्न हा सिनेमा सलमानला हिंदीत करायचा आहे. त्यासाठी प्रवीण आणि त्याची मिटिंगही झाली.

मुंबई : सलमान खानचा सिनेमा म्हटलं की त्याचे चाहते तो सिनेमा डोक्यावर घ्यायला तयार असतात. पण आता प्रदर्शनापूर्वीच सलमानचा राधे हा खतरनाक ठरणार आहे. राधेला आता खरी पावर मिळणार आहे. कारण मराठी सिनेमातला पॉवरबाज कलाकार या सिनेमात असणार आहे. याचं कारण असं की राधे या सिनेमामध्ये असणार आहे आपला मराठमोळा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे.
गेल्या काही महिन्यांपासून राधे या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. सलमान त्याच शूटमध्ये व्यस्त आहे. लॉकडाऊनमुळे या शूटला खीळ बसली आहे. पण असं असलं तरी या सिनेमातला प्रवीण तरडेचा भाग शूट करून झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रवीण आणि सलमान भेट घेत आहेत. मुळशी पॅटर्न हा सिनेमा सलमानला हिंदीत करायचा आहे. त्यासाठी प्रवीण आणि त्याची मिटिंगही झाली.
सिनेमेटोग्राफर महेश लिमये याच्या संदर्भामुळे सलमान आणि प्रवीण यांची ही भेट होऊ शकली असं बोललं जातं. या भेटीमध्ये सलमान आणि प्रवीणचं अनेक मुद्द्यांवर एकमत झालं. त्यातून सलमानने प्रवीणला य सिनेमात काम करणार का असं विचारलं. अर्थात प्रवीणनेही कोणतेही आढेवेढे न घेता होकार दिला. सलमानने दिलेला हा प्रस्ताव नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. राधे या सिनेमात प्रवीणने मराठी माणसाचीच भूमिका केली आहे.
राधेमधलं त्याचं शूट जवळपास १० दिवस चाललं. प्रवीण तरडे याने या निमित्ताने पहिल्यांदाच हिंदी व्यावसायिक चित्रपटात भूमिका केली आहे. हा अनुभव निश्चितच आनंददायी होता असं तो त्याच्या निकटवर्तीयांना सांगतो. प्रवीण सध्या हंबीरराव मोहिते यांच्यावरचा सिनेमा करण्यात गर्क आहे. लॉकडाऊनमुळे त्याच्या या सिनेमाचंही किरकोळ चित्रिकरण राहिलं आहे. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा त्याचा मानस आहे. मुळशी पॅटर्न हिंदीत येण्याबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget