Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Rashmika Mandanna Health Update Instagram post: रश्मिका मंदानाची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल. फ्लॉन्ट केलं मंगळसुत्र.

Rashmika Mandanna Shares Recovery Update: अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या आपल्या रिकव्हरी स्टेजमध्ये आहे. शूटिंगदरम्यान, तिला दुखापत झाली होती. ती काही दिवसांपासून ब्रेकवर आहे. दीड महिने तिला बेड रेस्टचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. अभिनेत्री सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. अलिकडेच अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमधून (Instagram Post) रश्मिकाने तिच्या कुटुंबासोबत, पाळीव प्राणी ऑरा आणि पती विजय देवराकोंडासोबत घालवलेल्या (Vijay Deverakonda) दिवसांची झलक नेटकरी आणि चाहत्यांसोबत शेअर केली. तिने एका फोटोमध्ये आपलं मंगळसुत्रही फ्लॉन्ट केलं. सध्या रश्मिकाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
रश्मिका मंदानाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल (Rashmika Mandanna Shares Recovery Update in instagram post)
रश्मिका सध्या बेड रेस्टवर आहे. तिला दुखापत झाली होती. यामुळे ती सध्या आपल्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. रश्मिकाने इन्स्टाग्रामवर, आपल्या कुटुंबासोबतचा फॅमिली टाइम, पाळीव प्राणी, आणि काही स्वत:चे ओव्हरसाईज टी-शर्ट घालून आणि चष्मा घालून पोज दिलेले फोटो शेअर केले आहेत. तिनं या फोटोतून आपले मंगळसुत्रही दाखवले. अभिनेत्री आपल्या पोस्टला कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्री म्हणाली, 'ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे की, जेव्हा तुम्ही दिवसभर धावपळ करता, तेव्हा स्पीड कमी करणे ही दुसरी बाजू भीतीदायक वाटू लागते. पण तुम्हाला जेव्हा गती कमी करण्यास भाग पाडले जाते, तेव्हा वेड्यासारखी धावपळ करणे भीतीदायक वाटू शकते'.
'कदाचित हेच आयुष्य आहे. प्रचंड प्रेम, सकारात्मकता, प्रार्थना आणि कृतज्ञतेच्या वातावरणात वेढली गेली आहे', असं रश्मिका मंदाना म्हणाली. पोस्टमध्ये अभिनेत्रीने ब्राऊन रंगाचा ओव्हरसाईज टी-शर्ट घातला आहे. डोळ्यांवर चश्मा आहे. तसेच गळ्यात सुंदर मंगळसुत्र आहे. तिच्या मंगळसुत्राची डिझाईन खूप सिंपल आणि सुंदर आहे. काळ्या मण्यांमध्ये एक फुलाचे पेंडंट आहे. दुसऱ्या फोटोमध्ये कुटुंबातील काही सदस्य आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये रश्मिकाने पती विजय देवरकोंडाचा हात धरला आहे.
View this post on Instagram
एका व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या घरातील पाळीव कुत्रा दिसत आहे. व्हिडीओत ऑरा खेळताना दिसत आहे. तर, आणखी एका व्हिडीओमध्ये लोकांना अन्नदान करण्यात येत आहे. रश्मिकाची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आहे. 'Mysaa' सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान, रश्मिकाला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे अभिनेत्रीला प्रचंड त्रास झाला. तिनं सांगितलं की, एका डान्स सीनदरम्यान, दुखापत झाली. वेदनेमुळे काही काळ दूर राहावे लागले, असं तिनं सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा























