Telly Masala : ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनचा संताप ते 'मी काळवीटाची शिकार केली नाही' म्हणणारा सलमानचा VIDEO व्हायरल; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मनोरंजनसृष्टी दररोज वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
VIDEO : छोट्या पडद्यावरील संस्कारी मुलाने बिग बॉसच्या घरातील सदस्याला केलं KISS? लिपलॉक करतानाचा व्हिडीओ व्हायरल
Bigg Boss 18 Latest Update : बिग बॉस सीझन 18 ला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील राड्यामुळे बिग बॉस प्रेमींचं चांगलं मनोरंजन होताना दिसत आहे. बिग बॉस 18 च्या घरातील सदस्यांन दररोज नवनवीन समस्यांना सामोरं जावं लागत आहे, त्यासोबत सदस्यांचे एकमेकांसोबत वाद होताना दिसत आहे. क्षुल्लक कारणावरुन सुरु होणाऱ्या वादामुळे सदस्यांसोबत जोरदार खटके उडताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात अविनाश मिश्राचं दररोज कोणत्या न कोणत्या सदस्यांबरोबर भांडण होताना दिसत आहे. सध्या अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा याचं भांडण चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
एकीकडे ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची चर्चा अन् दुसरीकडे 'या' अभिनेत्रीशी जुळलं अभिषेक बच्चनचं नाव, लग्नाबद्दल विचारताच म्हणाली...
Abhisheak Bachchan Nimrat Kaur Relationship Rumors : बॉलिवूड कलाकारांची प्रोफेशनला लाईफसोबतच पर्सनल लाईफही खूप चर्चेत असते. अनेक असेही सेलिब्रिटी आहेत, जे त्यांच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असतात. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहतेही खूप उत्सुक असतात. सोशल मीडियावर सेलिब्रिटींबाबत वेगवेगळ्या चर्चाही होताना पाहायला मिळतात. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन बॉलिवूडच्या चर्चित जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या नात्याता काहीही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Ramayana : रणवीर कपूरच्या रामायणमध्ये KGF स्टारची एन्ट्री, यश साकारणार रावणाची भूमिका
Yash Confirm Ravan Role In Ranbir Kapoor Ramayan : दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित रामायण चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याची जोरदार चर्चा आहे. रामायण चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार असून सितामातेच्या भूमिकेत अभिनेत्री साई पल्लवी झळकणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाबाबत प्रत्येक नव्या अपडेटकडे चाहते डोळे लावून आहेत. या चित्रपटाबाबत आता नवीन अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात राम आणि सीतेच्या भूमिकेतील स्टार्सची निवड झाल्यानंतर रावणाच्या भूमिकेची चर्चा सुरु होती. आता रावणाच्या भूमिकेसाठी सुपरस्टार अभिनेत्याची निवड झाली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
VIDEO : ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनचा संताप, म्हणाला, "आता बस्स झालं..."
Abhishek Bachchan Video : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कपलचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला धोका दिल्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. अभिषेक बच्चन दुसऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याने ऐश्वर्या आणि अभिषेकचं नातं तुटल्याचं बोललं जात आहे. यासंबंधित अनेक पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान, अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पापाराझींवर भडकताना दिसत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Salman Khan : 'मी काळवीटाची शिकार केली नाही', बिश्नोई गँगच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा VIDEO व्हायरल
Salman Khan Video Viral on Blackbuck Poaching Case : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. सलमान खानवर काळविटाची शिकाल केल्याचा आरोप आहे. काळवीट बिश्नोई समाजासाठी पुजनीय असल्यामुळे सलमान खानला बिश्नोई गँगकडून धमकी मिळत आहे. अलिकडे माजी मंत्री बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याची जबाबदारी घेत लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानसोबतची मैत्री यामागचं कारण असल्याचं सांगितलं. दरम्यान, काळवीट शिकार प्रकरण फार जुनं आहे. 1998 मध्ये सलमान खानने काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
सलमान खानचं लग्न ठरलेलं, पत्रिकाही छापल्या; पण संगीता बिजलानीनं भाईजानला 'या' अभिनेत्रीसोबत रंगेहाथ पकडलं अन् लग्न मोडलं
Salman Khan Love Life : आजवर आपण सलमान खानच्या अनेक रिलेशनशिप्सबाबत ऐकलं असेल. मग, सलमान-ऐश्वर्या असो किंवा सलमान-कतरिना... आपण त्याच्या अनेक रिलेशनशिप्सचे किस्से ऐकले आहेत. असंच एक सलमानचं गाजलेलं प्रेमप्रकरण संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) सोबतचं... असं सांगितलं जातं की, संगीता बिजलानी आणि सलमान खानचं लग्नही ठरलेलं. अगदी लग्न पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या, पण अचानक असं काहीतरी घडलं आणि दोघांचं लग्न मोडलं. नेमकं काय घडलेलं, याबाबत सांगताना काही दिवसांपूर्वी सलमान खानच्याच एका एक्स गर्लफ्रेंडनं दावा केला होता.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Bigg Boss 18: छेडछाडीच्या आरोपानं रजत शहजादा भिडले,औकात काय म्हणत केली चिखलफेक, बिगबॉसच्या घरात 5 नॉमिनेशन
Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात सध्या भांडण तंटा आणि तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात 17 व्या एपिसोडमध्ये पाच जणांचे नॉमिनेशन झाले. यावेळी छेडछाडीच्या आरोपावरून रजत आणि शहजादा भिडल्याचे दिसून आले. एकमेकांची औकात काय? असं म्हणत त्यांनी एकमेकांवर चिखलफेक केल्याचे दिसून आले. यावेळी घरच्यांनी या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तरीही ते कोणालाही बधले नाहीत. शेवटी घरच्यांनी दोघांनाही बाजूला नेत समजावल्याचे दिसले. त्यांचे भांडण संपते ना संपते तोच अविनाश आणि श्रुतिकाचे भांडण सुरू झाले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...