एक्स्प्लोर

Salman Khan Love Life: सलमान खानचं लग्न ठरलेलं, पत्रिकाही छापल्या; पण संगीता बिजलानीनं भाईजानला 'या' अभिनेत्रीसोबत रंगेहाथ पकडलं अन् लग्न मोडलं

Salman Khan Love Life: सलमान खान आणि संगीता बिजलानी 90 च्या दशकातील गाजलेली जोडी. रुपेरी पडद्यावरही आणि खासगी आयुष्यातही. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते.

Salman Khan Love Life: सध्या बिश्नोई गँगच्या (Bishnoi Gang) निशाण्यावर असलेला बॉलवूडचा (Bollywood) दबंग भाईजान सलमान खान सुरक्षेच्या गराड्यात आहे. जेवढा सलमान खान (Salman Khan) त्याच्या चित्रपटांसठी चर्चेत असतो, तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो. आजवर आपण सलमान खानच्या अनेक रिलेशनशिप्सबाबत ऐकलं असेल. मग, सलमान-ऐश्वर्या असो किंवा सलमान-कतरिना... आपण त्याच्या अनेक रिलेशनशिप्सचे किस्से ऐकले आहेत. असंच एक सलमानचं गाजलेलं प्रेमप्रकरण संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) सोबतचं... असं सांगितलं जातं की, संगीता बिजलानी आणि सलमान खानचं लग्नही ठरलेलं. अगदी लग्न पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या, पण अचानक असं काहीतरी घडलं आणि दोघांचं लग्न मोडलं. नेमकं काय घडलेलं, याबाबत सांगताना काही दिवसांपूर्वी सलमान खानच्याच एका एक्स गर्लफ्रेंडनं दावा केला होता. 

सलमान खान आणि संगीता बिजलानी 90 च्या दशकातील गाजलेली जोडी. रुपेरी पडद्यावरही आणि खासगी आयुष्यातही. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.मीडिया रिपोर्ट्सनुसार,  1994 मध्ये दोघांनी साखरपुडा उरकून घेतला. दोन्ही घरांमध्ये लगीनघाई सुरू झाली. लग्नपत्रिका छापल्या, आमंत्रणं पाठवली गेली. दोन बॉलिवूड सुपरस्टार्सचं लग्न त्यावेळी चर्चेचा विषय ठरलं होतं. पण, का काण जाणे, लग्नाच्या फक्त एकच दिवस आधी दोघांच्या नात्याला नवं वळण मिळालं आणि लग्न मोडलं. दोघांची प्रेम कहाणी अधुरी राहिली. त्यावेळी याबाबत माध्यमांमध्ये अनेक चर्चा झाल्या. आजही या मोडलेल्या लग्नाचा उल्लेख झाल्यानंतर पुन्हा एकदा ते किस्से रंजकपणे रंगवून सांगितलं जातात. पण नेमकं काय घडलेलं तेव्हा? एक दिवस आधीच का मोडलं लग्न? यासर्व गोष्टींचा उलगडा सलमान खानची एक्स गर्लफ्रेंज सोमी अलीनं एका जुन्या मुलाखतीत केला होता. 

View this post on Instagram
 
A post shared by Sangeeta Bijlani (@sangeetabijlani9)

सोमी अलीनं एका जुन्या मुलाखतीत बोलताना याबद्दल सांगितलं होतं. खरं तर, सोमी अली 90 च्या दशकात सलमान खानसोबत प्रेम करत होती. सोमी अलीनं सलमान खान आणि संगीता बिजलानीच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं होतं.

सोमी अलीमुळे सलमानचं लग्न मोडलं

सोमी अलीनं दावा केला की, संगीता बिजलानीनं सलमानसोबतचं नातं संपवलं, कारण तिनं सलमानला सोमी अलीसोबत रंगेहाथ पकडलं होतं. सोमी अली म्हणाली की, लग्नाची पत्रिका छापली होती. पण संगीतानं माझ्या अपार्टमेंटमध्ये सलमानला रंगेहाथ पकडलं होतं. सलमान माझ्यासोबत होता. सलमाननं संगीतासोबत जे केलं, तेच पुढे माझ्यासोबतही झालं. यालाच 'कर्मा' म्हणतात. मला त्यावेळी या गोष्टी समजल्या नव्हत्या. पण ज्यावेळी मी थोडी मॅच्योअर झाली. त्यावेळी मला या सर्व गोष्टी लक्षात आल्या. 

सलमान खानच्या सपोर्टमध्ये बोलतेय सोमी अली 

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर बिश्नोई गँगच्या निशाण्यावर सलमान खान आला आहे. या सर्व गदारोळात सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली मात्र, सलमानच्या बाजून बोलत आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सतत धमक्या येत आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगचं म्हणणं आहे की, सलमान खाननं काळविाटाची शिकार केली आहे. काळवीट बिश्नोई समाजासाठी पवित्र आणि पूजनिय आहे. त्यामुळे सलमान खाननं बिश्नोई समाजाची माफी मागावी. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बिश्नोई गँगनं सलमानच्या घराबाहेर गोळीबारही केला. 

यावर सोमी अलीनं एबीपी न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. सलमान खाननं काळवीट मारल्याचं सोमी अलीचं म्हणणं आहे. सलमान खाननं स्वत: तिला याबद्दल सांगितलं होतं, पण त्यावेळी सलमान खानला हे माहीत नव्हतं की, बिश्नोई समाजासाठी ते इतकं पवित्र आहे. सलमाननं जाणूनबुजून काही केलेलं नाही. बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन सलमान खान माफी मागणार असल्याचंही सोमी अलीनं म्हटलं आहे. यासोबतच सोमी अलीनं तुरुंगात जाऊन लॉरेन्स बिश्नोईला भेटायची इच्छाही व्यक्त केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजाBajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र कार्यालयात पोहोचले
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Embed widget