एक्स्प्लोर

Telly Masala : ऐश्वर्याचा हात फ्रॅक्चर कसा झाला? ते मुंबईतल्या दामोदर नाट्यगृहावर हातोडा; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala :  मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Damodar Natyagruha Exclusive : मुंबईतल्या दामोदर नाट्यगृहावर हातोडा, नाट्यगृह वाचवण्यासाठी प्रशांत दामलेंचा उपोषणाचा इशारा

Damodar Natyagruha : नाटकासह तमाशा, लावणी आणि लोककलेची अभिजात परंपरा जपणारी रंगकर्मींची हक्काची जागा म्हणजे परळचं दामोदर नाट्यगृह (Damodar Natyagruha). 101 वर्षांची परंपरा असणारं दामोदर नाट्यगृह गेल्या काही दिवसांपासून पुनर्बांधणीमुळे चर्चेत आहे. पण आता या नाट्यगृहावर हातोडा पडला आहे. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींकडून पाडकामाची पाहणी करण्यात आली. दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aishwarya Rai Bachchan : घरातच असूनही ऐश्वर्याचा हात फ्रॅक्चर कसा झाला? समोर आलं मोठं कारण

Aishwarya Rai Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने (Aishwarya Rai Bachchan) कान्स महोत्सवात (Cannes 2024) हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्याच्या लूकची चर्चा झाली. मात्र, ऐश्वर्याच्या हाताला असलेली दुखापत पाहून चाहत्यांच्या काळजात धस्स झाले. कान्समधील ऐश्वर्याचा व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हिडीओ कमेंट्सवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स आल्या. ऐश्वर्या राय जखमी कशी झाली असा अनेकांना प्रश्न पडला. ऐश्वर्या सध्या कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करत नाही. तरीदेखील तिच्या हाताला दुखापत कशी झाली,असा प्रश्न चाहत्यांच्या मनात पडला होता.  आता ऐश्वर्याच्या दुखापतीचे कारण समोर आले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Top 5 Fashion Designers : 'हे' आहेत बॉलीवूडचे 'टॉप 5' फॅशन डिझायनर, पैशाच्या बाबतीत बड्या उद्योगपतींनाही मागे टाकले

Top 5 Fashion Designers : बॉलिवूड (Bollywood) सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या दमदार अभिनयासह आपल्या हटके लूक्समुळेही चर्चेत असतात. त्यांच्या लूक्सची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ निर्माण होते. या कलाकारांचं सौंदर्य खुलवण्यात मेकअप आर्टिस्टसह फॅशन डिझायनरचाही (fashion Designers) मोठा रोल असतो. हे फॅशन डिझायनर सेलिब्रिटींसह देशालाही रिप्रेझेंट करतात. त्यांनी डिझाइन केलेल्या कपड्यांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. अनेक फॅशन डिझायनरने मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींची संपत्ती निर्माण केली आहे. हे फॅशन डिझायनर बॉलिवूडसह हॉलिवूड कलाकारांच्या कपड्यांचं डिझाइन बनवताना दिसून येतात. जाणून घ्या बॉलिवूडच्या टॉप 5 फॅशन डिझानरबद्दल...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

PM Modi Biopic : PM मोदींची व्यक्तीरेखा साकारणार बाहुबलीतील कट्टप्पा? अभिनेता सत्यराज यांनी म्हटले, हे तर...

PM Modi Biopic Kattappa Sathyaraj :  भारतीय सिनेइंडस्ट्रीतील आतापर्यंतचा ब्लॉकबस्टर ठरलेल्या बाहुबली (Baahubali) चित्रपटात कट्टप्पा या व्यक्तीरेखेने आपली छाप सोडली. अभिनेता सत्यराज (Sathyaraj ) यांनी साकारलेली कटप्पा ही भूमिका प्रभासच्या बाहुबली इतकीच महत्त्वाची होती. कटप्पाने बाहुबलीला का मारले, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सिनेरसिकांनी बाहुबलीचा दुसरा भाग पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली. कट्टप्पाची भूमिका साकारणारे सत्यराज यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सत्यराज हे पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Happy Birthday Suhana Khan : अमिताभ बच्चन यांच्या नातवासोबत अफेअर, वडील बॉलिवूडचा किंग! जाणून घ्या शाहरुखची लाडकी लेक सुहानाबद्दल...

Suhana Khan Birthday : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लाडकी लेक सुहाना खान (Suhana Khan) आज आपला 24 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुहाना बी-टाऊनच्या लोकप्रिय स्टार किड्समध्ये एक आहे. शाहरुखच्या लाडक्या लेकीने मागील वर्षी जोया अख्तरच्या (Zoya Akhtar) 'द आर्चीज' (The Archies) या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. आज सुहानाच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घ्या...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget