Aishwarya Rai Bachchan : घरातच असूनही ऐश्वर्याचा हात फ्रॅक्चर कसा झाला? समोर आलं मोठं कारण
Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या सध्या कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करत नाही. तरीदेखील तिच्या हाताला दुखापत कशी झाली,असा प्रश्न चाहत्यांच्या मनात पडला होता. आता ऐश्वर्याच्या दुखापतीचे कारण समोर आले आहे.
Aishwarya Rai Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने (Aishwarya Rai Bachchan) कान्स महोत्सवात (Cannes 2024) हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्याच्या लूकची चर्चा झाली. मात्र, ऐश्वर्याच्या हाताला असलेली दुखापत पाहून चाहत्यांच्या काळजात धस्स झाले. कान्समधील ऐश्वर्याचा व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हिडीओ कमेंट्सवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स आल्या. ऐश्वर्या राय जखमी कशी झाली असा अनेकांना प्रश्न पडला. ऐश्वर्या सध्या कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करत नाही. तरीदेखील तिच्या हाताला दुखापत कशी झाली,असा प्रश्न चाहत्यांच्या मनात पडला होता. आता ऐश्वर्याच्या दुखापतीचे कारण समोर आले आहे.
View this post on Instagram
ऐश्वर्याचा हात फ्रॅक्चर कसा झाला?
ऐश्वर्या रायने स्लिंग घालून रॅम्प वॉक केला तेव्हा लोकांनी तिचे कौतुक केले. त्याचवेळी तिच्या हातालाकाय झाले या विचाराने चाहतेही चिंतेत होते. 'मिड-डे'च्या वृत्तानुसार, 11 मे रोजी ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली होती. ती घरात पडल्याने तिचे मनगट फ्रॅक्चर झाले होते. त्याच्या मनगटातील सूज कमी झाल्यानंतर तिने आपले काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आता शस्त्रक्रिया होऊ शकते.
ऐश्वर्यावर होणार शस्त्रक्रिया...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याचा हात फ्रॅक्चर झाल्याच्या दोन दिवसानंतर तिची डिझायनर सोबत कॉस्ट्यूम फिटिंग होती. तिने यावेळी वेन्यू मोठं आणि कम्फर्टेबल असावे अशी विनंती केली. ज्यामुळे तिला कोणताही त्रास होणार नाही. दुखापत झालेली असूनही ऐश्वर्याने वेळ दिल्याबद्दल ब्रँडने तिचे आभार मानले. हातावरील सूज उतरल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करता येईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. ऐश्वर्या सध्या फिजिओथेरपी घेत असून डॉक्टरांसोबत चर्चा केल्यानंतर तिने कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली.
'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये ऐश्वर्याचा जलवा
View this post on Instagram
'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्याचा जलवा पाहायला मिळाला आहे. ऐश्वर्या रायने कान्सच्या पहिल्या दिवशी काळ्या-पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर दुसऱ्या दिवशी निळा, हिरवा आणि सिल्वर रंगाचा टिनसेल गाऊन परिधान केला होता. तिचे दोन्ही लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये ऐश्वर्याने लाडकी लेक आराध्या बच्चनसोबत हजेरी लावली होती.