Bawankule On Eknath Shinde | शिंदेंची भूमिका म्हणजे राज्याच्या 14 कोटी जनतेच्या मनातला निर्णय
Bawankule On Eknath Shinde | शिंदेंची भूमिका म्हणजे राज्याच्या 14 कोटी जनतेच्या मनातला निर्णय
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. भाजपचं केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. आपण नाराज नसल्याचंदेखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे. आपला महायुतीच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा असेल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी ही भूमिका मांडल्यानंतर भाजपची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी भूमिका मांडली. बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुकदेखील केलं.





















