Telly Masala : ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पदवीधर ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'लग्न कल्लोळ'; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Twinkle Khanna : वय केवळ आकडाच, ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पदवीधर! पत्नीसाठी अक्षय कुमारची खास पोस्ट, म्हणाला,"मी सुपरवुमनसोबत लग्न केलंय"
Twinkle Khanna Graduate : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) इंडस्ट्रीपासून दूर आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विंकल परदेशात शिक्षणाचे धडे गिरवतेय. आता वयाच्या 50 व्या वर्षी ती पदवीधर झाली आहे. वया हा केवळ आकडाच हे तिने सिद्ध केलं आहे. पत्नीने पदवी मिळवल्यानंतर अक्षयने खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sania Mirza Shoaib Malik : सानिया मिर्झा अन् शोएब मलिकच्या घटस्फोटाच्या चर्चा; टेनिस स्टारच्या क्रिप्टिक पोस्टने नेटकरी हैराण
Sania Mirza Shares a Cryptic Post Amid Shoaib Malik Divorce News : भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. 2022 पासून सानिया आणि शोएब यांच्यात सारं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता टेनिस स्टारने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणवली लता दीदींची कमी; शेअर केला गायलेल्या गाण्याचा शेवटचा श्लोक
PM Narendra Modi Shares Lata Mangeshkar Shlok : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) उद्घाटनाची देशभर चर्चा आहे. 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित असणार आहेत. दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची कमी जाणवली आहे. लता दीदींनी गायलेल्या शेवटच्या श्लोकचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
VIDEO: "तोंड का लपवतोय?"; अभिनेत्याचा हा अंदाज पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 2023 मध्ये डंकी, पठाण आणि जवान हे त्याचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. प्रेक्षक आता त्याच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. अशातच शाहरुख खानचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हा त्याचा चेहरा लपवताना दिसत आहे. शाहरुखचा हा अंदाज पाहून नेटकऱ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Lagnakallol : मयुरी देशमुखचा 'लग्न कल्लोळ'; सिद्धार्थ जाधव की भूषण प्रधान कोणासोबत अडकणार लग्नबंधनात?
Lagnakallol : मराठी मनोरंजनसृष्टीसाठी 2024 हे वर्ष खूपच खास आहे. विविध विषयांवर भाष्य करणारे, वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 2023 प्रमाणे 2024 मध्येही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 'लग्न कल्लोळ' (Lagnakallol) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट झालं आहे.