Lagnakallol : मयुरी देशमुखचा 'लग्न कल्लोळ'; सिद्धार्थ जाधव की भूषण प्रधान कोणासोबत अडकणार लग्नबंधनात?
Lagnakallol : 'लग्न कल्लोळ' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट झालं आहे.
Lagnakallol : मराठी मनोरंजनसृष्टीसाठी 2024 हे वर्ष खूपच खास आहे. विविध विषयांवर भाष्य करणारे, वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 2023 प्रमाणे 2024 मध्येही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 'लग्न कल्लोळ' (Lagnakallol) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट झालं आहे.
'लग्न कल्लोळ' या सिनेमाचं लक्षवेधी मोशन पोस्टर आऊट झालं आहे. डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. मोशन पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे.
भूषण प्रधान, मयुरी देशमुख अन् सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिकेत
'लग्न कल्लोळ' या सिनेमाचं नवीन मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या जबरदस्त पोस्टरमध्ये भूषण प्रधान (Bhushan Pradhan), मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) आणि सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. तिघांच्याही हातात हार असून आता ही वरमाला कोणाच्या गळ्यात पडणार, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
'लग्न कल्लोळ' कधी रिलीज होणार?
'लग्न कल्लोळ' सिनेमाच्या नवीन पोस्टरसोबत रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. 'लग्न कल्लोळ' हा सिनेमा 1 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.
कलरफुल पोस्टरने वाढली प्रेक्षकांची उत्सुकता
'लग्न कल्लोळ' या चित्रपटाच्या नावावरून आणि मोशन पोस्टरवरून हा चित्रपट 'लग्न' या विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे, हे दिसतेय. मात्र आता यात 'कल्लोळ' काय पहायाला मिळणार, याचे उत्तर मात्र चित्रपटच देऊ शकेल. दरम्यान या चित्रपटाचे पोस्टर अतिशय कलरफुल आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे.
'लग्नकल्लोळ' या सिनेमाबाबत बोलताना दिग्दर्शक दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणाले,"लग्न हा विषय तसा म्हटला तर अतिशय जिव्हाळयाचा. हा विषय घेऊन अतिशय सुंदररित्या या चित्रपटाचे लेखन करण्यात आले आहे. पोस्टरवरून प्रेक्षकांना हा अंदाज आला असेलच की, हा चित्रपट प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहे. यात हसू आहे, आसूही आहेत. त्यामुळे आता या 'लग्न कल्लोळा'त सहभागी होण्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहा".
संबंधित बातम्या