![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Twinkle Khanna : वय केवळ आकडाच, ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पदवीधर! पत्नीसाठी अक्षय कुमारची खास पोस्ट, म्हणाला,"मी सुपरवुमनसोबत लग्न केलंय"
Twinkle Khanna Graduate : अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्नाने शिक्षण पूर्ण केलं आहे. वयाच्या 50 व्या वर्षी ती पदवीधर झाली आहे.
![Twinkle Khanna : वय केवळ आकडाच, ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पदवीधर! पत्नीसाठी अक्षय कुमारची खास पोस्ट, म्हणाला, Akshay Kumar Wife Twinkle Khanna graduates with Master Degree Akshay Kumar celebrates his wife academic success Akshay Kumar gets emotional as Twinkle graduates from University of London Know Details Twinkle Khanna : वय केवळ आकडाच, ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पदवीधर! पत्नीसाठी अक्षय कुमारची खास पोस्ट, म्हणाला,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/17/521eae8ec38f87207f3421c949cac2b21705457785295254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Twinkle Khanna Graduate : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) इंडस्ट्रीपासून दूर आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विंकल परदेशात शिक्षणाचे धडे गिरवतेय. आता वयाच्या 50 व्या वर्षी ती पदवीधर झाली आहे. वया हा केवळ आकडाच हे तिने सिद्ध केलं आहे. पत्नीने पदवी मिळवल्यानंतर अक्षयने खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे.
ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पदवीधर झाली आहे. ट्वींकलने तिचा लेक आरवसह परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आता तिचं शिक्षण पूर्ण झालं असून तिला पदवीदेखील मिळाली आहे. खिलाडीने खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे.
View this post on Instagram
ट्विंकल खन्ना एक लेखिका म्हणून लोकप्रिय आहे. कोरोनानंतर तिने आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. लंडन विद्यापीठात पिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्रेममध्ये तिने प्रवेश घेतला. आता यासंदर्भातील तिचं शिक्षण पूर्ण झालं आहे. ट्विंकल खन्नावर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
अक्षय कुमारची खास पोस्ट (Akshay Kumar Post for Twinkle Khanna)
अक्षय कुमारने पत्नीसाठी खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला अभ्यास करण्याबद्दल सांगितलं त्यावेळी मला खरचं आश्चर्य वाटलं होतं. पण अभ्यासाच्या वेडापायी तू घेत असलेली मेहनत पाहून मला वाटलं की मी एका सुपरवुमनसोबत लग्न केलं आहे. घर, करिअर आणि मुलांकडे लक्ष देण्यासोबत तू विद्यार्थी म्हणूनदेखील चांगली कामगिरी केली आहेस. मीदेखील अभ्यास केला असता तर मला अधिक चांगल्या शब्दात तुझ्याबद्दलचा अभिमान व्यक्त करता आला असता. टीना...खूप शुभेच्छा आणि खूप-खूप प्रेम".
ट्विंकल खन्नाच्या पोस्टने वेधलं लक्ष (Twinkle Khanna Post)
अक्षयसह ट्विंकल खन्नादेखील एक खास पोस्ट शेअर केली आहे. पदवीचा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,"अखेर मी पदवीधर झाले. हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. या दिवसाला खास करण्यात माझ्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. आपण नेहमीच काही ना काही करायला स्वत:ला प्रेरणा द्यायला हवी. मग ते योग्य असो किंवा अयोग्य".
अक्षय कुमारचा 'बडे मिया छोटे मिया' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात खिलाडी टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
संबंधित बातम्या
VIDEO: मालदीवमध्ये सायकलिंग करताना ट्विंकल खन्नासोबत घडली घटना; पत्नीला पाहून खिलाडी अक्षय खळखळून हसला, व्हिडीओ व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)