PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणवली लता दीदींची कमी; शेअर केला गायलेल्या गाण्याचा शेवटचा श्लोक
PM Narendra Modi Shares Lata Mangeshkar Shlok : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर यांची कमी जाणवली आहे. लता दीदींनी गायलेल्या शेवटच्या श्लोकचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
PM Narendra Modi Shares Lata Mangeshkar Shlok : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) उद्घाटनाची देशभर चर्चा आहे. 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित असणार आहेत. दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची कमी जाणवली आहे. लता दीदींनी गायलेल्या शेवटच्या श्लोकचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांचं बहिण-भावाचं नातं होतं. मोदींसाठी लता दीदींनी सोशल मीडियावर अनेकदा खास पोस्ट शेअर केल्या आहेत. लता मंगेशकरांच्या निधनानंतर आलेल्या रक्षाबंधनालाही मोदींना दीदींची आठवण आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणवली लता मंगेशकरांची कमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे,"भारतीयांना 22 जानेवारी 2024 या दिवसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान आपल्याला अनेकांची कमी जाणवत आहे. यातीलच एक म्हणजे लता दीदी. लता दीदींनी गायलेल्या एका श्लोकाचा व्हिडीओ शेअर करत आहे. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, लता दीदींनी हा श्लोक शेवटचा रेकॉर्ड केला होता".
As the nation awaits 22nd January with great enthusiasm, one of the people who will be missed is our beloved Lata Didi.
— Narendra Modi (@narendramodi) January 17, 2024
Here is a Shlok she sung. Her family told me that it was the last Shlok she recorded. #ShriRamBhajanhttps://t.co/MHlliiABVX
'या' सेलिब्रिटींनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील मंडळी अयोध्येला मोठ्या संख्येने जात आहेत. यात सिनेसृष्टीतील कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील मंडळींचादेखील समावेश आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला रजनीकांत, अनुष्का शर्मा, विराट कोहली, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, आयुष्मान खुराना, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफसह अनेक कलाकार सामील होणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत एक प्लॉट खरेदी केला आहे. 14 कोटी रुपयांत त्यांनी हा प्लॉट खरेदी केला आहे.
संगीतकार सलील कुलकर्णी यांनी श्रीराम प्रतिष्ठापनेनिमित्त एक खास गाणं रचलं आहे. सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांनी हे गाणं गायलं आहे. हृदय में श्रीराम हैहर कंठ में श्रीराम है ।।, असे या गाण्याचे बोल आहेत. संदीप खरे यांनी हे गीत लिहिलं आहे.
संबंधित बातम्या