Telly Masala : कंगनाने संदीप रेड्डी वांगाची ऑफर धुडकावली ते हार्दिक जोशी 'स्टार प्रवाह'वर करणार कमबॅक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
![Telly Masala : कंगनाने संदीप रेड्डी वांगाची ऑफर धुडकावली ते हार्दिक जोशी 'स्टार प्रवाह'वर करणार कमबॅक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या telly masala marathi movie marathi serial latest update Rajinikanth movie lal Salaam movie trailer Hardik Joshi come back on Star pravah serial Telly Masala : कंगनाने संदीप रेड्डी वांगाची ऑफर धुडकावली ते हार्दिक जोशी 'स्टार प्रवाह'वर करणार कमबॅक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/06/18f29915c8e8eb72becc5e326a9746291707212111252290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Lal Salaam Movie Trailer Launch : रजनीकांतची धडाकेबाज अॅक्शन, कपिल देवही झळकणार;ऐश्वर्याच्या लाल सलामचा ट्रेलर लाँच
सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी ऐश्वर्याचा आगामी 'लाल सलाम' चित्रपटाचा ट्रेलर (Lal Salaam Movie) रिलीज झाला आहे. या चित्रपटात विक्रांत आणि विष्णू मुख्य भूमिकेत आहेत. रजनीकांत ही आपल्या मुलीच्या चित्रपटात दिसणार आहेत. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. खेळाच्या माध्यमातून धार्मिक सलोखा वाढवण्यावर हा चित्रपट भाष्य करतो. कपिल देव ही या चित्रपटात दिसणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kangana Ranaut : कंगनाने संदीप रेड्डी वांगाची ऑफर धुडकावली; मला रोल देऊ नका, नाहीतर तुमचे अल्फा मेल अॅक्टर...
बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रनौतने (Kangana Ranaut) आणि अॅनिमल (Animal Movie) चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्यात आता वादाची ठिणगी पडली असल्याचे चित्र दिसत आहे. संदीप रेड्डी वांगा याचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कंगनाने टीकेची झोड उठवली होती. त्यानंतरही संदीपने कंगनाचे कौतुक करत तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, कंगनाने पुन्हा एकदा संदीप रेड्डी वांगावर पलटवार केला आहे. कंगनाने संदीपची ऑफर धुडकावून लावत चार खडे बोल सुनावले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Hardik Joshi : हार्दिक जोशी 'स्टार प्रवाह'वर करणार कमबॅक; 'या' मालिकेत होणार धमाकेदार एण्ट्री
अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) पुन्हा एकदा आता 'स्टार प्रवाह'वर कमबॅक करणार आहे. काही कालावधीसाठी हार्दिक 'स्टार प्रवाह'पासून दूर होता. आता हार्दिक पुन्हा एकदा स्टार प्रवाहवरील मालिकेत झळकणार आहे. स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत पुन्हा एकदा अभिनेता हार्दिक जोशीची म्हणजेच शुभंकरची एण्ट्री होणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..
Rani Mukerji on Black’s OTT release : 19 वर्षानंतर ब्लॅक प्रेक्षकांच्या भेटीला; ओटीटी रिलीजनंतर राणी मुखर्जी भारावली, म्हणाली...
बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांचा दमदार अभिनय असलेला 'ब्लॅक' चित्रपट (Black Movie OTT Release) 19 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ब्लॅक (Black Movie) हा चित्रपट हा बॉलिवूडमधील आयॉनिक चित्रपट समजला जातो. अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जीच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. आता 19 वर्षानंतर पुन्हा एकदा ब्लॅक रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रतिसादाने राणी मुखर्जी भारावून गेली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Karan Grover And Bipasha Basu : मुलीच्या हृदयाला दोन छिद्र, काळजीने अभिनेता दु:खात बुडाला, अभिनेत्री पत्नीने सावरलं
वडील आणि मुलीचे नातं हे वेगळं असते. वडिलांचे मुलीवर सर्वाधिक प्रेम असते. मुलगी आजारी असली की सर्वाधिक काळजी वडिलांना असते. अभिनेता करण सिंह ग्रोव्हरही (Karan Grover) त्याला अपवाद नाही. करण सिंह ग्रोव्हर आणि त्याची पत्नी अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) यांच्या घरी नोव्हेंबर 2022 मध्ये चिमुकलीचे आगमन झाले. बाळाच्या जन्माआधी बाळाच्या हृदयाला छिद्र आहे. या बातमीने करण आणि बिपाशा हादरले होते. मुलीच्या आजारपणामुळे फायटर चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाण्याची इच्छाही करणला होत नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)