(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kangana Ranaut : कंगनाने संदीप रेड्डी वांगाची ऑफर धुडकावली; मला रोल देऊ नका, नाहीतर तुमचे अल्फा मेल अॅक्टर...
Kangana Ranaut Sandeep Reddy Vanga : कंगनाने पुन्हा एकदा संदीप रेड्डी वांगावर पलटवार केला आहे. संदीपची ऑफर धुडकावून लावत चार खडे बोल सुनावले आहे.
Kangana Ranaut Sandeep Reddy Vanga : बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रनौतने (Kangana Ranaut) आणि अॅनिमल (Animal Movie) चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्यात आता वादाची ठिणगी पडली असल्याचे चित्र दिसत आहे. संदीप रेड्डी वांगा याचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कंगनाने टीकेची झोड उठवली होती. त्यानंतरही संदीपने कंगनाचे कौतुक करत तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, कंगनाने पुन्हा एकदा संदीप रेड्डी वांगावर पलटवार केला आहे. कंगनाने संदीपची ऑफर धुडकावून लावत चार खडे बोल सुनावले आहे.
कंगना रनौतने संदीप रेड्डी वांगा यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणत आहे की, जर त्याला संधी मिळाली आणि कोणतीही भूमिका कंगनासाठी अनुकूल असेल तर तो तिच्यासोबत नक्कीच काम करेल. 'क्वीन' आणि इतर चित्रपटांतील कंगनाचा अभिनय त्याला आवडला असल्याचे संदीपने म्हटले. याच व्हिडीओत संदीपने म्हटले की, कंगनाने अॅनिमलबद्दल काही नकारात्मक कमेंट केली असेल तर त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. मला त्याचा राग नाही आला. मी त्यांचे खूप काम पाहिले आहे. त्यामुळे कंगनाने चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिली तरी मला त्याचे वाईट वाटत नाही.
कंगनाने संदीप रेड्डी वांगाला सुनावले
कंगनाने संदीप रेड्डी वांगाचा हा व्हिडिओ शेअर करत आपले उत्तर दिले आहे. कंगनाने म्हटले की, समीक्षा आणि टीका एकच नसतात, प्रत्येक प्रकारच्या कलेची समीक्षा आणि चर्चा व्हायला हवी, ही एक सामान्य गोष्ट आहे. माझ्या समीक्षेवर हसत हसत संदीपजींनी ज्या प्रकारे माझ्याबद्दल आदर दाखवला, त्यावरून असे म्हणता येईल की ते केवळ पुरुषप्रधान चित्रपटच बनवत नाहीत, तर त्यांची वृत्तीही तशीच आहे.धन्यवाद सर...
समीक्षा और निंदा एक नहीं होते, हर तरह की कला की समीक्षा और चर्चा होनी चाहिए यह एक सामान्य बात है ।
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 5, 2024
संदीप जी ने जैसे मेरी समीक्षा पे मुस्कुराते हुए मेरे प्रति आदर का भाव दिखाया, ये कहा जा सकता है की वो सिर्फ़ मर्दाना फ़िल्में ही नहीं बनाते, उनके तेवर भी मर्दाना हैं, धन्यवाद सर 🙏… https://t.co/qi2hINWYcu
कंगनाने पुढे म्हटले की, मला कोणतीही भूमिका देऊ नका. नाहीतर तुमचे अल्फा मेल फेमिनिस्ट होतील आणि तुमचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटतील. तुम्ही ब्लॉकबस्टर चित्रपट तयार करा, तुमची सिने इंडस्ट्रीला गरज असल्याचे तिने म्हटले.
'अॅनिमल' चित्रपटावर कंगनाची टीका
कंगनाने अॅनिमल चित्रपटावर टीका केली होती. असे चित्रपट प्रेक्षकांना महिलांना मारहाण करण्यास प्रोत्साहित करत आहेत, महिलांकडे फक्त लैंगिक भूक शमवण्याचे साधन म्हणून दाखवले जात आहे. अॅनिमल चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी आदींच्या भूमिका होत्या.