Hardik Joshi : हार्दिक जोशी 'स्टार प्रवाह'वर करणार कमबॅक; 'या' मालिकेत होणार धमाकेदार एण्ट्री
Hardik Joshi : अभिनेता हार्दिक जोशी पुन्हा एकदा आता स्टार प्रवाह वर कमबॅक करणार आहे.
Hardik Joshi : अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) पुन्हा एकदा आता 'स्टार प्रवाह'वर कमबॅक करणार आहे. काही कालावधीसाठी हार्दिक 'स्टार प्रवाह'पासून दूर होता. आता हार्दिक पुन्हा एकदा स्टार प्रवाहवरील मालिकेत झळकणार आहे. स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत पुन्हा एकदा अभिनेता हार्दिक जोशीची म्हणजेच शुभंकरची एण्ट्री होणार आहे.
स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे वैदेहीच्या मृत्यूला मोनिकाच जबाबदार असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड होणार आहे. तर दुसरीकडे मोनिकासाठी सनी नावाच्या व्यक्तीने लिहिलेली प्रेमपत्र मल्हारच्या हाती लागणार आहेत. त्यामुळे मल्हार आणि मोनिकाच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे. मल्हार-मोनिकाचं नातं निर्णायक वळणावर असताना मालिकेत पुन्हा एकदा अभिनेता हार्दिक जोशीची म्हणजेच शुभंकरची एण्ट्री होणार आहे. मोनिकाला प्रेमपत्र लिहिणारा सनी म्हणजे स्वत: शुभंकर असल्याचा खुलासा तो करणार आहे. त्यामुळे शुभंकरच्या रुपात मोनिकाच्या आयुष्यात पुन्हा नवं वादळ आलं आहे. अडचणीच्या या परिस्थितीतून मोनिका कसा मार्ग काढणार? मल्हार मोनिकाला माफ करणार का? काय असेल मल्हार-मोनिकाच्या नात्याचं भविष्य हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडणार आहे.
'जाऊ बाई गावात'चं पहिलं पर्व घेणार प्रेक्षकांचा निरोप
11 फेब्रुवारी रोजी ‘जाऊ बाई गावात’ ह्या बहुचर्चित शो च्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. ह्या फिनाले आठवड्यात रमशा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, स्नेहा भोसले आणि श्रेजा म्हात्रे हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. ह्या अंतिम भागात स्पर्धकांच्या आता पर्यंतच्या प्रवासाची झलक पाहायला मिळेल. त्यासोबत हे फायनॅलिस्ट स्पर्धक दमदार परफॉर्मेंस सादर करणार आहे. तर, आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर हे अंतिम फेरीसाठी प्रमुख पाहुणे असणार आहेत.
'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतील हार्दिकनं राणादा ही भूमिका साकारली. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हार्दिकचा चाहता वर्ग मोठा आहे. आता त्याचा जाऊ बाई गावात हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
मनोरंजन विश्वातील इतर संबंधित बातम्या :