एक्स्प्लोर

Telly Masala : "हसताय ना? हसायलाच पाहिजे", निलेश साबळेचा नव्या चॅनलवर नवा शो ते 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका कधी निरोप घेणार? जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Abhijeet Bhattacharya On Amitabh Bachchan : बॉलिवूडमध्ये मीच देशभक्त, बाकी सगळे ढोंगी; गायक अभिजितने अमिताभ बच्चनवरही साधला निशाणा

Abhijeet Bhattacharya On Amitabh Bachchan :   बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. मागील वर्षी त्याने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानवर निशाणा साधला होता. शाहरुख खान (Shahrukh Khan) हा स्वार्थी असून स्वत:च्या कामासाठी लोकांचा वापर करत असल्याचा आरोप अभिजीतने केला होता. आता त्याने  नाव न घेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याशिवाय स्वत:ला 'खरा देशभक्त' म्हणवून घेतले आहे.  बॉलिवूडमधील इतर कलाकारांची देशभक्ती हा ढोंगीपणा असल्याचे त्याने म्हटले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

निलेश साबळे पुन्हा विचारणार, "हसताय ना? हसायलाच पाहिजे"; पण चॅनल मात्र नवं अन् सोबतचे सवंगडीही नवेच

Nilesh Sable New Comedy Show  :   छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी  झी मराठी वाहिनीवरून 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्याआधी या कॉमेडी शोमधून निलेश साबळेने एक्झिट घेतली होती. डॉ. निलेश साबळेने (Dr. Nilesh Sable) शो सोडल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. मात्र, आजारपण आणि इतर काही कारणांनी शो सोडला असल्याचे निलेश साबळे यांनी सांगितले होते. मात्र, निलेश साबळे पुन्हा एकदा नवा कॉमेडी शो घेऊन येत आहे. निलेश साबळे “हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!” हा नवा शो घेऊन येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर हा शो 20 एप्रिल पासून सुरू होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका कधी निरोप घेणार? ऐश्वर्या नारकरांनी सांगितलं

Marathi Serial Updates :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satvi Mulgi) सध्या रंगतदार वळणावर आहे. नेत्रा आणि विरोचकमध्ये वार-पलटवार सुरू आहे.सस्पेन्स, थ्रिलर असलेल्या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आलेत. या ट्विस्टमुळे कथानकात बदल होत असल्याने  प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रेक्षकांकडूनच मालिका बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. आता,  मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी यावर भाष्य केले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Marathi Serials : आवाज मराठीचा! 'स्टार प्रवाह परिवारा'चा आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला धोबीपछाड, रचला नवा विक्रम

Marathi Serials TVR Rating : मराठी मालिकाविश्वात (Marathi Serials) विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रसारित होत आहेत. झी मराठी (Zee Marathi), कलर्स मराठी (Colours Marathi), सोनी मराठी (Sony Marathi) अशा विविध चॅनल्सवर या मालिकांचं प्रसारण होत आहे. नुकतचं टीव्हीआर (TVR)रेटिंग समोर आलं आहे. टीव्हीआर रेटिंगमध्ये स्टार प्रवाहच्या (Star Pravah) 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag), साधी माणसं (Sadhi Mansa) आणि 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) या मालिकांनी बाजी मारली आहे. टीव्हीआर रेटिंगमध्ये IPL च्या ओपनिंग रेसेमनीलादेखील (IPL 2024 Opening Ceremony) स्टार प्रवाह परिवार पुरस्कारने (Star Pravah Parivar Puraskar 2024) मागे टाकलं आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या टेलिव्हिजन इतिहासात सर्वोच्च Viewership मिळवणारी स्टार प्रवाह एकमेव वाहिनी ठरली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा....

Bollywood Latest News : पहिला पगार 50 रुपये, आज दररोज कमावतोय 10 कोटी, 6300 कोटींच्या संपत्तीचा मालक

Bollywood Latest News :   बॉलीवूडचे ग्लॅमरस, झगमगाट अनेकांना आकर्षित करतो. या ग्लॅमरस दुनियेत आपला ठसा उमटवण्याचे स्वप्न घेऊन दररोज अनेक तरुण मुंबईत पोहोचतात. मात्र, त्यापैकी काही मोजक्याच लोकांना त्यांचे स्वप्न साकारण्याची संधी  मिळते आणि यशस्वी होतात. एक मुलगाही मोठी स्वप्ने घेऊन मुंबईत दाखल झाला होता.  मेहनतीच्या जोरावर आज त्याच्याकडे भरपूर संपत्ती आणि अफाट कीर्ती आहे. एकेकाळी त्याचा पहिला पगार फक्त 50 रुपये होता.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget