एक्स्प्लोर

Abhijeet Bhattacharya On Amitabh Bachchan : बॉलिवूडमध्ये मीच देशभक्त, बाकी सगळे ढोंगी; गायक अभिजितने अमिताभ बच्चनवरही साधला निशाणा

Abhijeet Bhattacharya On Amitabh Bachchan : गायक अभिजीत भट्टाचार्याने नाव न घेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याशिवाय स्वत:ला 'खरा देशभक्त' म्हणवून घेतले आहे.

Abhijeet Bhattacharya On Amitabh Bachchan :   बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. मागील वर्षी त्याने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानवर निशाणा साधला होता. शाहरुख खान (Shahrukh Khan) हा स्वार्थी असून स्वत:च्या कामासाठी लोकांचा वापर करत असल्याचा आरोप अभिजीतने केला होता. आता त्याने  नाव न घेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याशिवाय स्वत:ला 'खरा देशभक्त' म्हणवून घेतले आहे.  बॉलिवूडमधील इतर कलाकारांची देशभक्ती हा ढोंगीपणा असल्याचे त्याने म्हटले. 

गायक अभिजीतने 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, बॉलिवूडमध्ये देशभक्तांची संख्या कमी आहे. याच मुलाखतीत त्याने नाव न घेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला. 

देशभक्त असल्याने इंडस्ट्रीत स्ट्र्गल करावा लागला

अभिजीतने म्हटले की, मी देशभक्त असल्याने इंडस्ट्रीत खूप संघर्ष करावा लागला. माझ्या मूर्खपणावर आजही हसतो. माझ्या चुकांसाठी माझ्याकडे फक्त एक ओळ आहे - देशभक्त असल्याचे भासवा, परंतु प्रत्यक्षात एक होऊ नका. काही दांभिक देशभक्त आहेत ज्यांना याचा मोबदला मिळतो, तर या सिनेइंडस्ट्रीत फक्त मी देशभक्त असल्याचे परिणाम मला भोगावे लागत आहेत असेही त्याने म्हटले.

बॉलिवूडमध्ये सच्चा देशभक्तांची कमतरता 

अभिजीतने आपल्या मुलाखतीत म्हटले की, बॉलिवूडमध्ये सच्चा देशभक्तांची कमतरता आहे. सिनेइंडस्ट्रीमधील दुटप्पी भूमिकांचांही त्याने उल्लेख केला. त्याने नाव न घेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यावरही निशाणा साधला. अभिजीतने म्हटले की, एक व्यक्ती काही वक्तव्य करतो आणि दुसरी व्यक्ती ती गोष्ट नाकारते, विशेषत: राजकीय भूमिकांबाबत हे होत असते. 

नवरा राम मंदिरात आणि त्याची पत्नी संसदेत काहीही बडबड करते...

अभिजीतने म्हटले की, बॉलिवूडमध्ये खरा देशभक्त नाही. इथे नवरा काहीतरी बोलतो आणि त्याची बायको संसदेत जाऊन त्याच गोष्टींची खिल्ली उडवते. येथे कोणी रामलल्लाचे दर्शन घेणार आहे, तर एका विशिष्ट पक्षाशी संबंधित त्यांची पत्नी प्रभू रामांवर टीका करत आहे. त्यामुळे मी म्हणेन की पैसे देऊन कुणालाही देशभक्त बनवू नका. या कारणाने माझे खूप पैसे आणि बरेच काही गमावले असे अभिजीतने म्हटले. 

राम मंदिर  प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात अमिताभ यांची उपस्थिती

अभिजीतने उघडपणे कोणाचेही नाव घेतले नाही, पण त्याचा संदर्भ थेट अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याशी होता. यावर्षी 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन झाले तेव्हा  अमिताभ बच्चन या सोहळ्याला उपस्थित होते. तर त्यांच्या पत्नी, अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांची अनुपस्थिती होती. 

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget