एक्स्प्लोर

Bollywood Latest News : पहिला पगार 50 रुपये, आज दररोज कमावतोय 10 कोटी, 6300 कोटींच्या संपत्तीचा मालक

Bollywood Latest News : पहिला पगार म्हणून 50 रुपये घेणारा हा अभिनेता आज 6300 कोटींचा मालक आहे.

Bollywood Latest News :   बॉलीवूडचे ग्लॅमरस, झगमगाट अनेकांना आकर्षित करतो. या ग्लॅमरस दुनियेत आपला ठसा उमटवण्याचे स्वप्न घेऊन दररोज अनेक तरुण मुंबईत पोहोचतात. मात्र, त्यापैकी काही मोजक्याच लोकांना त्यांचे स्वप्न साकारण्याची संधी  मिळते आणि यशस्वी होतात. एक मुलगाही मोठी स्वप्ने घेऊन मुंबईत दाखल झाला होता.  मेहनतीच्या जोरावर आज त्याच्याकडे भरपूर संपत्ती आणि अफाट कीर्ती आहे. एकेकाळी त्याचा पहिला पगार फक्त 50 रुपये होता.

हा मुलगा आज बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतोय. हा मुलगा म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आहे.  शाहरुख खानचा (Shahrukh Khan) जन्म नोव्हेंबर 1965 मध्ये दिल्लीत मीर ताज मोहम्मद खान आणि लतीफ फातिमा यांच्या घरात झाला. शाहरुखच्या वडिलांचे 1981 मध्ये कर्करोगाने निधन झाले, तर त्याची आई मधुमेहाची रुग्ण होती आणि तिनेही 1991 मध्ये जगाचा निरोप घेतला. यावेळी शाहरुख संघर्षमय काळातून जात होता.

शाहरुख खानची अभिनय कारकीर्द कधी सुरू झाली?

शाहरुख खानने आपल्या अभिनय कारकिर्दीला छोट्या पडद्यापासून सुरुवात केली होती. त्यांनी 1989 मध्ये 'फौजी' हा टीव्ही शो केला. या मालिकेतील लेफ्टनंट अभिमन्यू रायच्या भूमिकेतून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर शाहरुख खानने 'सर्कस', 'दिल दरिया' सारखे शो देखील केले. टीव्हीवर बरीच ओळख निर्माण केल्यानंतर तो बॉलिवूडकडे वळला आणि 1992 मध्ये आलेल्या 'दिवाना' सिनेमातून पदार्पण केले. किंग खानचा हा चित्रपट सुपर-डुपर हिट ठरला होता. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला.

या चित्रपटानंतर शाहरुखने मागे वळून पाहिले नाही आणि एकापाठोपाठ अनेक उत्तम चित्रपट दिले. काही वेळातच तो रोमान्स किंग बनला. मागील वर्षी शाहरुखच्या तीन बॅक टू बॅक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली. वर्षाच्या सुरुवातीला किंग खानचा 'पठाण' हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर आलेल्या 'जवान'ने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा 'डंकी'ही सुपरहिट ठरला होता.

शाहरुख खानची पहिली कमाई किती होती?

शाहरुख खान आज भारतीय सिनेइंडस्ट्रीचा सुपरस्टार असला तरी तो आपले सुरुवातीचे दिवस विसरला नाही. एका मुलाखतीत शाहरुखने आपल्या कमाईबद्दल सांगितले होते. त्याने सांगितले की, पंकज उधास यांच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये मी काम केले होते. त्यावेळी मला 50 रुपये मिळाले होते. या पैशातून मी त्यावेळी आग्र्यातील ताज महाल पाहण्यास गेलो होतो, असे त्याने सांगितले. 

शाहरुख खानची संपत्ती किती?

शाहरुख खानची सिने इंडस्ट्रीतील पहिली कमाई 50 रुपये असली तरी तो आज अब्जाधीश आहे. ग्लोबल सुपरस्टार असलेला शाहरुख खानची एकूण संपत्ती ही 6300 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. मागील दशकभराच्या काळात शाहरुखच्या संपत्तीत 300 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. व्यवसाय, चित्रपट, जाहिरात अशा विविध मार्गाने शाहरुखला उत्पन्न मिळते. बिझनेस टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, वर्ष 2010 मध्ये शाहरुख खानचे उत्पन्न हे 1500 कोटी होते. त्यावेळी शाहरुख 10 मिनिटांच्या एका डान्स परफॉर्मेन्ससाठी 5 कोटी इतके मानधन घेत असत, आता 8 ते 10 कोटी रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
Embed widget