एक्स्प्लोर

Telly Masala : अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक ते गश्मीर महाजनीने सांगितल्या वडिलांबाबतच्या हृदयद्रावक आठवणी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

अभिनेते मिथून चक्रवर्ती यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट, ब्रेनस्ट्रोक झाल्याची माहिती, कोलकाताच्या खासगी रुग्णालयात दाखल

अभिनेते आणि राजकारणी मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या प्रकृतीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिथून चक्रवर्ती यांना कोलकाता (Kolkata) येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिथून चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक झाला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Gashmeer Mahajani On Ravindra Mahajani : कधी दार बडवलं जायचं, तर कधी आई, एवढाच काय तो फरक; गश्मीर महाजनीने सांगितल्या हृदयद्रावक आठवणी

Gashmeer Mahajani On Ravindra Mahajani : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते  रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी माधवी महाजन (Madhavi Mahajani) यांनी आपले आत्मचरित्र  लिहिले असून त्याचे प्रकाशन झाले आहे. या आत्मचरित्रात रविंद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) याने वडिलांबाबतच्या हृदयद्रावक आठवणी सांगितल्या आहेत. वडील रविंद्र महाजनी यांच्याकडून आईला मारहाण होत असल्याचे त्याने म्हटले. घरी कधी दार बडवलं जायचं, तर कधी आई एवढाच काय तो फरक असल्याचे गश्मीरने म्हटले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Ashok Saraf : बॉलिवूडशी तुलना करताना मराठी सिनेसृष्टीबद्दल अशोक सराफ यांनी हे काय म्हटले? जुना व्हिडीओ होतोय व्हायरल...

Ashok Saraf On Marathi Cine Industries :  मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी स्थान मिळवले. रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांच्या अभिनयाचा प्रवास अजूनही सुरू आहे. आजही अशोक सराफ हे मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत. अशोक सराफ यांना कलाक्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र भूषण जाहीर करण्यात आला. या पुरस्काराच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मनापासून आनंद व्यक्त केला. अशोक सराफ यांची एक जुनी व्हिडीओ क्लीप व्हायरल होत आहे. यामध्ये अशोक सराफ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील फरक सांगत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Rasika Vengurlekar : 'हास्यजत्रा'फेम रसिका वेंगुर्लेकरसाठी नवऱ्याची खास पोस्ट, तुलाही आयुष्यात मोठं होताना...

Rasika Vengurlekar :  छोट्या पडद्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा कॉमेडी शो चांगलाच लोकप्रिय आहे. या शोमधील कलाकारांना नवीन ओळख मिळाली. या कलाकारांचा एक चाहता वर्गदेखील आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये वेगवेगळ्या व्यक्तीरेखा साकारणारी रसिका वेंगुर्लेकर (Rasika Vengurlekar) हिचाही एका चाहता वर्ग आहे. रसिकासाठी तिचा नवरा अनिरुद्ध शिंदे (Aniruddha Shinde) याने खास पोस्ट लिहिली आहे. अनिरुद्ध आणि रसिका यांच्या लग्नाचा वाढदिवस 9 फेब्रुवारी रोजी झाला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...  

Esha Deol Divorce : भरत तख्तानी सोबतच्या 12 वर्षाच्या संसाराचा काडीमोड का झाला? ईशा देओलने म्हटले, त्याच्यासाठी मी...

Esha Deol Divorce :  बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलने (Esha Deol) भरत तख्तानीसोबत (Bharat Takhtani) सुरू असलेला संसाराचा प्रवास 12 वर्षानंतर थांबवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी दोघांनी एक निवेदन जारी करत घटस्फोट घेणार असल्याचा निर्णय जाहीर केला. मागील काही महिन्यांपासून या घटस्फोटाच्या निर्णयाची चर्चा सुरू होती. आता या घटस्फोटामागील कारण समोर आले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget