Rasika Vengurlekar : 'हास्यजत्रा'फेम रसिका वेंगुर्लेकरसाठी नवऱ्याची खास पोस्ट, तुलाही आयुष्यात मोठं होताना...
Rasika Vengurlekar : रसिकासाठी तिचा नवरा अनिरुद्ध शिंदे याने खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे.
Rasika Vengurlekar : छोट्या पडद्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा कॉमेडी शो चांगलाच लोकप्रिय आहे. या शोमधील कलाकारांना नवीन ओळख मिळाली. या कलाकारांचा एक चाहता वर्गदेखील आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये वेगवेगळ्या व्यक्तीरेखा साकारणारी रसिका वेंगुर्लेकर (Rasika Vengurlekar) हिचाही एका चाहता वर्ग आहे. रसिकासाठी तिचा नवरा अनिरुद्ध शिंदे (Aniruddha Shinde) याने खास पोस्ट लिहिली आहे. अनिरुद्ध आणि रसिका यांच्या लग्नाचा वाढदिवस 9 फेब्रुवारी रोजी झाला.
रसिकाने 2018 मध्ये दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदेबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांच्या या विवाहाला सहा वर्ष पूर्ण झाली. अनिरुद्धने रसिकासाठी खास पोस्ट लिहिली आहे. अनिरुद्धने स्ट्रगल काळ आणि मिळालेले यश यात रसिकाने दिलेल्या मौल्यवान पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
अनिरुद्धने काय म्हटले?
अनिरुद्ध शिंदेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चढ-उतारात तू कायम माझ्यासोबत असतेस..अशीच माझ्या सोबत आयुष्यभर रहा.. माझ्याकडून घडलेल्या चुका तू नेहमी समजून घेतेस आणि मला योग्य तो मार्ग दाखवतेस..माणूस कधीच एकटा यशस्वी होत नाही.. त्याच्यासोबत असणारी माणसं,पाठीशी असलेली त्याची साथ,यामुळे त्याला बळ मिळतं..आणि मी यशस्वी होण्यामध्ये मोलाचा आणि जास्त वाटा तुझा आहे, असल्याचे अनिरुद्धने रसिकाबद्दल म्हटले आहे. त्याने पुढे म्हटले की, तुलाही आयुष्यात मोठं होताना बघुन खूप आनंद होतोय. खूप कौतुक वाटत तुझं,तुझ्या यशाच्या वाटचालीत मी नेहमी आहे तुझ्यासोबत कायम ..अशीच मेहनत करूया दोघांनी मिळून,कारण आपला प्रवास खूप दूरचा आहे,आणि ह्या प्रवासात तुझा हा सहप्रवासी नेहमी तुझ्यासोबत असल्याचे अनिरुद्ध शिंदेने म्हटले.
View this post on Instagram
अनिरुद्ध शिंदे कोण आहे?
अनिरुद्ध शिंदेने 'का रे दुरावा', 'फ्रेशर्स' सारख्या प्रसिद्ध मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. फ्रेशर्स या मालिकेत रसिकाने देखील महत्त्वाची भूमिका केली होती. महाविद्यालयीन जीवनापासून दोघेही रिलेशनशीपमध्ये आहेत. 10 वर्षाच्या रिलेशनशीपनंतर त्यांनी वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. दोघांचाही स्ट्रगलचा काळ एकत्रितपणे सुरू झाला. या काळात दोघांनीही एकमेकांना पाठिंबा दिला.