(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Telly Masala : अरुंधती गंभीर अपघातानंतर व्हेंटिलेटरवरच ते प्राईम व्हिडीओने केली 70 वेबसीरिज अन् चित्रपटांची घोषणा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
अरुंधती गंभीर अपघातानंतर व्हेंटिलेटरवरच; चाहत्यांना विनंती,"उपचारासाठी पैशांची मदत करा अन् देवाकडे प्रार्थनाही"
Arundhathi Nair on Ventilator : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री अरुंधती नायर (Arundhathi Nair) गंभीर अपघातामुळे सध्या चर्चेत आहे. अपघातानंतर अरुंधती व्हेंटिलेटरवर असून मृत्यूशी झुंज सुरू आहे. 14 मार्च 2024 रोजी तिचा अपघात झाला होता. त्यानंतर तिरुवनंतपुरम येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीच्या बहिणीने पोस्ट शेअर करत चाहत्यांना गंभीर अपघाताबाबत माहिती दिली होती. आता पुन्हा बहिणीने चाहत्यांना अरुंधतीसाठी देवाकडे प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Prime Video Release 70 Web Series Movies : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून 70 वेबसीरिज, चित्रपटांची घोषणा, मिर्झापूर, पंचायत, फॅमिली मॅनचा तिसरा सीझन कधी? पाहा यादी
Prime Video India to Release 70 Series And Movies : ओटीटी प्लॅटफॉर्मवरही जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने आपल्या नव्या चित्रपटांची, वेब सीरिजची घोषणा केल्यानंतर आता अॅमेझॉन प्राईमने दहा-पंधरा नव्हे तर तब्बल 70 वेब सीरिज आणि चित्रपटांची घोषणा केली. मंगळवारी एका कार्यक्रमात अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने घोषणा केली. अॅमेझॉन प्राईमच्या या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये नव्या वेब सीरिजबद्दल उत्सुकता वाढली आहे. मिर्झापूर, पंचायत, फॅमिली मॅन या मोस्ट अवेटेड वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचीदेखील घोषणा करण्यात आली. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' ही वेब सीरिजची घोषणा करण्यात आली. नागराज मंजुळे या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. तर, पाताल लोक या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Deepika Padukone : दोन अंडी, 2 बदाम, दुपारच्या जेवणात भाजी-भाकरी, 'हा' आहे प्रेग्नंट दीपिकाचा डाएट प्लॅन?
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दीपिका आणि रणवीरने (Ranveer Singh) काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना आई-बाबा होणार असल्याची गुड न्यूज दिली आहे. दीपिका पादुकोण प्रेग्नंट (Deepika Padukone Pregnant) असून तिची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. प्रेग्नंसीदरम्यान अभिनेत्री काही खास नियम फॉलो करत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Nagraj Manjule Matka King : नागराज मंजुळे आता ओटीटी गाजवणार; मटका किंग वेबसीरीजची घोषणा, 'हा' बॉलिवूड अभिनेता झळकणार
Nagraj Manjule Matka King : 'मिर्झापूर-3' बाबत (Mirzapur 3) मोठी घोषणा होईल या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईमने (Amazon Prime Video) मोठं गिफ्ट दिले आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून आज एकाच वेळी अनेक वेबसीरीज आणि चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यामध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) याच्या पहिल्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली. 'मटका किंग' या वेब सीरिजची (Matka King web series) आज घोषणा करण्यात आली. या वेब सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा हा मुख्य भूमिकेत असणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Ramayana : रणबीरच्या 'रामायण'मध्ये 'या' अभिनेत्याची एन्ट्री!
Ramayana : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) अभिनीत 'रामायण' (Ramayana) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकप्रिय सिने-दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'रामायण' या सिनेमात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता रवी दुबे (Ravi Dubey) लक्ष्मणाची (Laxman) भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Top 10 TV Actress : टीव्हीवर 'या' संस्कारी सूनबाई, पण वैयक्तिक आयुष्यात सिगारेटचा धूर आणि दारूशिवाय बोलत नाहीत!
TV Actress Loves Drink Alcohol : दारू, सिगारेट या गोष्टींचं एकदा व्यसन लागलं की ते सुटणं अवघड आहे, असं म्हटलं जातं. अनेक मंडळी व्यसनाच्या आहारी गेले आहेत. छोट्या पडद्यावर संस्कारी सूनबाईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री (Top 10 TV Actress) वैयक्तिक आयुष्यात मात्र व्यसनाच्या आहारी गेल्या आहेत. श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ते हिना खानपर्यंत (Hina Khan) अनेक अभिनेत्रींचा या यादीत समावेश आहे. इंडस्ट्रीतील प्रत्येक पार्टीत त्या दारू पिताना किंवा सिगारेट ओढताना दिसून येतात.