Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Ravindra Chavan : देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबत आक्षेप असेल तर रवींद्र चव्हाण यांना संधी द्यावी, असे बोलल्या जात असताना याबाबत आता स्वत: रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टोक्ती दिली आहे.
Ravindra Chavan Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा राज्याला असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय आमदार रवींद्र चव्हाण यांना फडणवीस यांनीच गुरुवारी दिल्लीत बोलावून घेतले होते. तर पालघरचा दौरा अर्धवट सोडून चव्हाण दिल्लीत गेल्याची माहिती पुढे आलीय. भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत अमित शाह यांची बैठक झाल्यानंतर बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया उमटेल, याची चाचपणी पक्षश्रेष्ठींनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या नावाबाबत आक्षेप असेल तर चव्हाण यांना संधी द्यावी, अशी खेळी खेळली जाऊ शकते, असेही बोलल्या जात असताना याबाबत आता स्वत: रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टोक्ती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले रवींद्र चव्हाण?
गेल्या २-३ दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाहीये. त्यामुळे कृपया प्रसार माध्यमांनी कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात, ही नम्र विनंती !
या आशयाची एक पोस्ट ट्विट करत रवींद्र चव्हाण यांनी याबबात भाष्य करत स्पष्टोक्ती दिली आहे.
डोंबिवली विधानसभेचे आमदार रवींद्र चव्हाण नेमके कोण?
रवींद्र चव्हाण यांचा जन्म 20 सप्टेंबर 1970 चा आहे.
डोंबिवली विधानसभेतून भाजप या पक्षाकडून 2009,2014 आणि 2019 आमदार म्हणून निवडून आले आहेत.
रवींद्र चव्हाण हे वैद्यकीय शिक्षण माहिती आणि तंत्रज्ञान खाद्य आणि नागरिक पुरवठा ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्याचे राज्यमंत्री होते.
2022 साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री , माहिती तंत्रज्ञान सार्वजनिक बांधकाम अन्न आणि नागरिक पुरवठा ग्राहक संरक्षण या खात्याचे ते मंत्री होते.
तर देवेंद्र फडणवीसांकडून रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे केले जाईल-
अजित पवार यांच्याच विमानाने रवींद्र चव्हाण गुरुवारी रात्री मुंबईत परत आले. शनिवारची अमावस्या संपल्यानंतर दिल्लीश्वर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील. देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पक्के आहेच, पण जर काही वेगळा विचार झाला तर देवेंद्र फडणवीसांकडून रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे केले जाईल असं सूत्रांच्या माहितीनूसार समोर येत आहे.
गेल्या २-३ दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाहीये. त्यामुळे कृपया प्रसार माध्यमांनी…
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) December 1, 2024
इतर संबंधित बातम्या