(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Deepika Padukone : दोन अंडी, 2 बदाम, दुपारच्या जेवणात भाजी-भाकरी, 'हा' आहे प्रेग्नंट दीपिकाचा डाएट प्लॅन?
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रेग्नंट आहे. प्रेग्नंसीदरम्यान अभिनेत्री काही खास नियम फॉलो करत आहे.
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दीपिका आणि रणवीरने (Ranveer Singh) काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना आई-बाबा होणार असल्याची गुड न्यूज दिली आहे. दीपिका पादुकोण प्रेग्नंट (Deepika Padukone Pregnant) असून तिची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. प्रेग्नंसीदरम्यान अभिनेत्री काही खास नियम फॉलो करत आहे.
प्रेग्नंसीदरम्यान दीपिका कोणते नियम फॉलो करते? (Deepika Padukone Pregnancy Rules)
बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, दीपिका पादुकोण सध्या जास्त काम करताना दिसत नाही. तिला प्रेग्नंसी एन्जॉय करायची आहे. तसेच प्रेग्नंसीदरम्यान तिला केवळ शारीरिकच नव्हे (Physical Health) तर मानसिक आयोग्यदेखील (Mental Health) जपायचं आहे. आई-वडिलांच्या घरी जाण्याव्यरिक्त दुसरीकडे कुठेही ती जात नाही. आई आणि सासूबाईंनी दिलेल्या टिप्स ती फॉलो करत आहे. रणवीरदेखील प्रेग्नंसीदरम्यान दीपिकाची खूप काळजी घेत आहे. दीपिकासाठी रणवीरच्या त्याच्या सर्व कमिटमेंट्स पूर्ण केल्या आहेत. बाळाच्या जन्मापर्यंत दीपिका या नियमांचं पालन करणार आहे.
दीपिका पादुकोण डाएट प्लॅन (Deepika Padukone Diet Plan)
दीपिका पादुकोणने प्रेग्नंसीची घोषणा केल्यापासून चाहते तिचा डाएट प्लॅन आणि फिटनेस ऐकण्यास उत्सुक आहेत. दीपिका नाश्त्याला इडली, डोसा, उपमा, 2 अंडी, 2 बदाम आणि 1 कप दूध पिते. तर दुपारच्या जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर तिचा भर असतो. डाळ, भाकरी-भाजी, नारळ पाणी या गोष्टींचा ती आहार करते. संध्याकाळी ती फिल्टर कॉफी पिते. तसेच रात्रीच्या जेवणात पालेभाज्या आणि सॅलेडचा समावेश करते.
दीपिका पादुकोण ब्रेक घेणार? (Deepika Padukone Movies)
दीपिका तिच्या वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक कामांमुळेदेखील चर्चेत आहे. 'फायटर' (Fighter) या सिनेमात दीपिका शेवटची झळकली होती. या सिनेमात हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) स्क्रीन शेअर करताना अभिनेत्री दिसली होती. या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. दीपिकाचा 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रभास (Prabhas) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिकेत आहेत. अमिताभसह दीपिकाने याआधी 'पीकू' (Piku) या सिनेमात एकत्र काम केलं होतं. तर प्रभाससोबत हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. आता प्रेग्नंसीदरम्यान दीपिका सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्रीच्या आणि रणवीरच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. तसेच दीपिका-रणवीरच्या बाळाचीदेखील प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या