(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagraj Manjule Matka King : नागराज मंजुळे आता ओटीटी गाजवणार; मटका किंग वेबसीरीजची घोषणा, 'हा' बॉलिवूड अभिनेता झळकणार
Nagraj Manjule Matka King : 'मिर्झापूर-3' बाबत मोठी घोषणा होईल या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईमने मोठं गिफ्ट दिले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या पहिल्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली.
Nagraj Manjule Matka King : 'मिर्झापूर-3' बाबत (Mirzapur 3) मोठी घोषणा होईल या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईमने (Amazon Prime Video) मोठं गिफ्ट दिले आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून आज एकाच वेळी अनेक वेबसीरीज आणि चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यामध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) याच्या पहिल्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली. 'मटका किंग' या वेब सीरिजची (Matka King web series) आज घोषणा करण्यात आली. या वेब सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा हा मुख्य भूमिकेत असणार आहे.
अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून #AreYouReady या हॅशटॅगसह प्रेक्षकांना प्रश्न विचारण्यात आला. मिर्झापूरच्या स्टारकास्टनेही #AreYouReady विचारल्याने मिर्झापूरबद्दल मोठी अपडेट असणार अशी अटकळ बांधली. मात्र, आज अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून एकाच वेळी अनेक वेब सीरिज आणि चित्रपटांची घोषणा करण्यात आली.
नागराज मंजुळे ओटीटी गाजवण्यास सज्ज
वेगळ्या धाटणीचे कथानक आणि दिग्दर्शनाचे कौशल्य यामुळे नागराज मंजुळेने सिनेसृष्टीवर छाप सोडली. आता, नागराज वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. आज नागराज मंजुळेच्या मटकाकिंग वेब सीरिजची घोषणा करण्यात आली. रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर प्रॉडक्शनकडून निर्मिती करण्यात येत असून सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुळे, अश्विनी सिडवानी, आशिष आर्यन हे निर्माते आहेत. तर, अभय कोरणे आणि नागराज मंजुळे यांनी लेखन केले आहे.
View this post on Instagram
मटका किंगची कथा काय?
अभिनेता विजय वर्मा यात मुख्य भूमिकेत असणार आहे. मुंबईतील कापसाचा एक व्यापारी कशाप्रकारे मटका जुगाराचा व्यवसाय चालवतो आणि त्यातून कशाप्रकारे आपले साम्राज्य उभारतो याभोवती वेब सीरिजची कथा आहे. मटका किंग रतन खत्रीच्या आयुष्यावर ही वेब सीरिज असल्याचे बोलले जात आहे. या वेब सीरिजमध्ये मुंबईतील 60-70 दशकातील चित्रण असणार आहे.