एक्स्प्लोर

Raosaheb Danve : नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Raosaheb Danve : भाजपची काम करण्याची एक पद्धत आहे. महाराष्ट्र राज्याचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) लाजीरवाणा पराभव झाला. यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण होणार? याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होतील, असे बोलले जात असले तरी अद्याप भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे अधिकृत नाव घोषित करण्यात आलेले नाही. आता भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे?

रावसाहेब दानवे म्हणाले की, भाजपची काम करण्याची पद्धत आहे. त्याप्रमाणे काम सुरू आहे. पक्षाने नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलवून नेता निवडला जाईल. महाराष्ट्र राज्याचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकांचा निकाल विचार करून स्क्रिप्ट लिहून ठेवली आहे. आता त्यावर सही होणार आणि मग नाव बाहेर येणार अर्थात नाव ठरवलेलं आहे. राज्याला माहिती आहे की, मुख्यमंत्री कोण होणार आहे. जनता संभ्रमात नाही. जनता तो पर्यंत बोलत नाही, तोपर्यंत आमचे वरिष्ठ नेते बोलत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

संजय राऊतांनाच मांत्रिकाची गरज

एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची? त्यांना बरं करण्यासाठी मांत्रिक अमित शहा पाठवत आहेत की नरेंद्र मोदी पाठवत आहेत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. यावर रावसाहेब दानवे म्हणाले की, संजय राऊतांनाच मांत्रिकाची गरज आहे. एखाद्या ठिकाणी मेंटल हॉस्पिटल असेल तर त्यांना नेले पाहिजे. तांत्रिक आणि मांत्रिक यावर राजकारण चालत नसतं.  त्यांचा विश्वास तांत्रिकावर आहे आणि माझा लोकांवर आहे, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली. 

शिंदे गावी गेल्यावर सरकार चालणार नाही का?

एकनाथ शिंदे अचानक गावी निघून गेल्यावरून देखील संजय राऊत यांनी टीका केली. यावर  उद्धव ठाकरे ऑपरेशन करायला गेले, तेव्हा सरकार चाललं, मग शिंदे गावी गेल्यावर सरकार चालणार नाही का? असा सवाल रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे अधिकार काय आहे हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे, असेही त्यांनी म्हटले. 

राऊतांना रुग्णालयात दाखल करायला हवे

डी. वाय. चंद्रचूड हे घटनाबाह्य पद्धतीने काम करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. याबाबत विचारले असता रावसाहेब दानवे म्हणाले की, त्यांनी पीएम, सरकार, निवडणूक आयोग, हाय कोर्टावर आरोप केले. हे स्वतः आरोपी आहेत आणि आरोप करत आहे. त्यांना दुसरे काय येत नाही. त्यांना रुग्णालयात दाखल करायला हवे. ईडीच्या कारवाईमुळे स्वतः संजय राऊत जेलमध्ये गेले हे स्वतः आरोपी असून लोकांवर आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

आणखी वाचा 

इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Embed widget