(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Telly Masala : देशभक्ती जागवणारा 'फायटर' ते शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सानिया मिर्झाची पोस्ट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Fighter Movie Review : कमालीची हवाई अॅक्शन दृश्ये असलेला, देशभक्ती जागवणारा 'फायटर'
Fighter Movie Review : हॉलीवूडमध्ये (Hollywood) देशभक्तीपर चित्रपट खोऱ्याने बनतात. अमेरिकन सैन्याची, पेंटॉगॉनची ताकद दाखवणारे अनेक चित्रपट आहेत आणि ते बॉक्स ऑफिसवर सुपरहिटही झालेले आहेत. त्यामुळे जगभरात अमेरिकन सैन्य म्हणजे सगळ्यात बलाढ्य ही जी गोष्ट सांगितली जाते त्याची पुष्टी हे चित्रपट करतात. भारतीय सैन्यही कमी नाही, पण त्यांची यशोगाथा दाखवणारे चित्रपट अभावानेच तयार झालेले आहेत. आणि जे तयार झाले त्यापैकी काही सुपरहिटही झाले आहेत. याचे कारण म्हणजे त्यात देशभक्तीसह सगळा मसाला पुरेपूर भरून एक मनोरंजक प्रेक्षकांना बांधून ठेवेल असे होते. 'हकीकत', 'बॉर्डर', '1971', 'लक्ष्य' 'उरी' ही नावे यासाठी घेता येतील. अजूनही अनेक याच यादीत आता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) अभिनयाने सजलेल्या 'फायटर'चे (Fighter) घेता येईल. या चित्रपटांमध्ये गाझी अटॅकसारख्या चित्रपटाचेही नाव घेता येईल. फार कमी लोकांनी गाझी अटॅक पाहिला असेल.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Fighter Box Office Collection : हृतिकच्या 'फायटर'चं शानदार लॅन्डिंग; बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस
Fighter Box Office Collection Day 1 : 'फायटर' (Fighter) हा 2024 च्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक असून या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर 'फायटर'चं लॅन्डिंग शानदार झालं आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kriti Sanon : अभिनेत्री कृती सेनेनला UAE ने दिला 'गोल्डन व्हिजा', या visa चे फायदे काय?
Kriti Sanon : नॅशनल अवॉर्ड विजेत्या अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) हिला UAE ने गोल्डन व्हिजा (Golden Visa) दिला आहे. यापूर्वीही बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना हा व्हिजा मिळाला होता. या यादीत आता कृती सेननचाही समावेश झाला आहे. ECH डिजीटलचे सीईओ इकबाल मार्कोनी यांच्याकडून कृतीला हा गोल्डन व्हिजा देण्यात आलाय. अभिनेत्री कृती सेननने हा व्हिजा मिळाल्यानंतर आभार मानले आहेत. कृती (Kriti Sanon) म्हणाली, युएईचा गोल्डन व्हिजा मिळणे, ही सन्मानाची बाब आहे. माझ्यासाठी दुबई फार खास आहे. मी दुबईच्या संस्कृतीचा हिस्सा बनण्यासाठी उत्सुक आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sania Mirza : शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सानिया मिर्झाने केली पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले,"आम्ही तुझ्यासोबतच"
Sania Mirza First Post After Shoaib Malik Wedding : टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) सध्या चर्चेत आहे. शोएब मलिकने तिसरं लग्न केल्याने नेटकरी हैराण झाले आहेत. दरम्यान शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर सानियाने आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी आम्ही तुझ्यासोबतच आहोत, असं म्हणत टेनिस स्टारला पाठिंबा दिला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Chiranjeevi : पद्मविभूषण मिळाल्यानंतर चिरंजीवी यांची पहिली प्रतिक्रिया
Chiranjeevi : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) एक दिवसापूर्वी म्हणजे गुरुवारी (दि.25) पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पद्म, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने एकूण 34 व्यक्तींचा गौरव करण्यात आलाय. दिग्गज अभिनेत्री वैजयंती माला आणि मिथुन चक्रवर्ती यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याबरोबरच दाक्षिणात्य अभिनेते, सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) यांचाही पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय सिनेक्षेत्रातील अनेकांना सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर चिरंजीवी यांनी एक व्हिडीओ शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे.