Chiranjeevi : पद्मविभूषण मिळाल्यानंतर चिरंजीवी यांची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओ शेअर करत म्हणाले
Chiranjeevi : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) एक दिवसापूर्वी म्हणजे गुरुवारी (दि.25) पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पद्म, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने एकूण 34 व्यक्तींचा गौरव करण्यात आलाय. दिग्गज अभिनेत्री वैजयंती माला आणि मिथुन चक्रवर्ती यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Chiranjeevi : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) एक दिवसापूर्वी म्हणजे गुरुवारी (दि.25) पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पद्म, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने एकूण 34 व्यक्तींचा गौरव करण्यात आलाय. दिग्गज अभिनेत्री वैजयंती माला आणि मिथुन चक्रवर्ती यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याबरोबरच दाक्षिणात्य अभिनेते, सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) यांचाही पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय सिनेक्षेत्रातील अनेकांना सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर चिरंजीवी यांनी एक व्हिडीओ शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे.
चिरंजीवी यांनी शेअर केला व्हिडीओ
चिरंजीवी (Chiranjeevi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. चिरंजीवी म्हणाले, मी फार कमी केले आहे. तरिही माझा सन्मान करण्यात आलाय. चिरंजीवी यांनी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर एक व्हिडीओ शेअर करत आभार मानले आहेत.
पुरस्काराबाबत समजल्यानंतर निशब्द झालो
शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये चिरंजीवी (Chiranjeevi) म्हणाले, "मला पुरस्कार मिळणार आहे, हे समजल्यानंतर मी निशब्द झालो होतो. मी वास्तविक पाहता फार विनम्र आणि आभारी आहे. हे प्रेक्षक, माझे मित्र आणि माझ्या बंधू-भगिनीचे प्रेम आहे. मी याबाबत ऋणी आहे. मी प्रत्येकवेळी आभार व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. कारकिर्दीतील 45 वर्षांमध्ये मी पडद्यावर संपूर्ण क्षमतेने लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केलाय. शिवाय, सामाजिक आणि माणूस म्हणून माझी जबाबदारी ओळखून मी गरजूंची मदत देखील केली आहे."
🙏🙏🙏 pic.twitter.com/4PDaCV2kzv
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) January 25, 2024
पंतप्रधान मोदींचेही मानले आभार
चिरंजीवी यांनी पीएम मोदींचेही आभार मानले. चिरंजीवी (Chiranjeevi) म्हणाले, "मी फार कमी केले आहे. तरिही माझा सन्मान करण्यात आलाय. तुमच्याकडून मिळालेल्या प्रेम आणि समर्थनासाठी मी कायम ऋणी आहे. हा सन्मान दिला याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. धन्यवाद.. जय हिंद ..!"
इतर महत्वाच्या बातम्या
Bigg Boss 17 : फिनालेआधी 'बिग बॉस 17'मधील 'TOP 3' स्पर्धकांची नावे समोर; अंकिता लोखंडेचा पत्ता कट?
View this post on Instagram
View this post on Instagram