Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या व्होटिंग ट्रेंड्समध्ये सूरज चव्हाण आघाडीवर, निक्की आणि अभिजीतही शर्यतीत; ट्रॉफीवर कोण नाव कोरणार?
Bigg Boss Marathi Grand Finale : बिग बॉस मराठीचा आज ग्रँड फिनाले पार पडणार असून कुणाच्या हाती ट्रॉफी जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा आज ग्रँड फिनाले पार पडणार आहे. बिग बॉसच्या घरातील 14 आठवड्यांचा प्रवास आज संपणार असून यंदाच्या सीझनचा विजेता मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहा फायनलिस्ट आहेत. सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार हे सदस्य ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत.
कोण होणार बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता?
आज बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) विजेत्याची घोषणा होणार आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेवर लागलं आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाचा सीझन प्रचंड गाजला. बिग बॉसची थीम, घरातील सदस्य ते होस्ट रितेश देशमुख या सर्वांनाच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत होता. निक्की तांबोळीची घरातील भांडणं आणि सूरज चव्हाणची झापुक-झुपुक एन्ट्री खूपच चर्चेत राहिली. आता या सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
सूरज, अभिजीत की निक्की, कुणाला सर्वाधिक व्होटिंग?
बिग बॉस मराठी पाचव्या सीझन आज धमाकेदार ग्रँड फिनाले पार पडणार आहे. अवघ्या काही तासांत यंदाच्या विजेत्याचं नाव जाहीर होईल. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेचं काऊंडडाऊन सुरु झालं आहे. सहा फायनलिस्ट सदस्यांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या सदस्याला जिंकवण्यासाठी भरपूर व्होटिंग केलं आहे. व्होटिंग ट्रेंड्समध्ये कोणत्या सदस्याचं नाव आघाडीवर आहे, ते जाणून घ्या.
व्होटिंग ट्रेंड्स काय सांगतात?
बिग बॉस मराठी इरा 5 या इंस्टाग्राम पेजवर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनसंबंधित अपडेट शेअर करण्यात आले आहेत. या पेजने बिग बॉस मराठी 5 चे व्होटिंग ट्रेंड्स सांगितले आहे. या ट्रेंड्सनुसार, महाराष्ट्राचा लाडका 'गुलिगत किंग' सूरज चव्हाण आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अंकिता वालावरकर आणि तिसऱ्या क्रमांकावर अभिजीत सावंत असल्याचं बोललं जात आहे. धनंजय पोवार व्होटिंग ट्रेंड्समध्ये चौथ्या क्रमांकावर तर, निक्की तांबोळी पाचव्या क्रमांकावर असून जान्हवी याबाबतीत सर्वाच पिछाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. आता बिग बॉस मराठी सीझन 5 च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :