(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Telly Masala : अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रेग्नेंट असल्याची चर्चा ते मिसफायरींग केसमुळे गोविंदाच्या अडचणी वाढण्याची शक्यता; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Ankita Lokhande Pregnancy : अभिनेत्री अंकिता लोखंडे देणार गूड न्यूज? प्रेग्नेंट असल्याची चर्चा; लाफ्टर शेफच्या सेटवरील VIDEO व्हायरल
Ankita Lokhande Pregnancy Rumors : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे हे घराघरांत पोहोचलेलं नाव आहे. पवित्र रिश्ता टीव्ही मालिकेमुळे अंकिताचं नाव देशभरात पोहोचलं आहे. अंकिता लोखंडे सध्या लाफ्टर शेफ शोमध्ये दिसत आहे. यादरम्यान, आता अंकिता लोखंडे प्रेग्नेंट असल्याचं बोललं जात आहे. अभिनेत्री लवकरच गूड न्यूज देणार असल्याची चर्चा रंगली आहे. लाफ्टर शेफ शोच्या सेटवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावरुन अंकिता लोखंडे गूड न्यूज देणार असल्याचं बोललं जात आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Govinda Firing Case : गोविंदाच्या अडचणीत वाढ? अभिनेत्याच्या मिसफायरींगच्या वक्तव्याशी मुंबई पोलिस सहमत नाहीत, समन्स पाठवण्याची शक्यता
Govinda Firing Case : 90 चा दशक गाजवलेला बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या अडचणीत सापडला आहे. गोविंदाकडून गोळी मिसफायर होऊन त्यालाच गोळी लागली. आता तो उपचारांसाठी रुग्णालयात दाखल आहे. या गोळीबार प्रकरणी प्रत्येक क्षणी नवीन अपडेट समोर येत आहेत. गोविंदाच्या वक्तव्याशी मुंबई पोलीस सहमत नाहीत, अशी बातमी समोर येत आहे. पोलिस गोविंदाच्या वक्तव्यावर समाधानी नसून ते या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचं सांगितलं जातं आहे. याशिवाय चौकशीसाठी गोविंदाला समन्सही पाठवलं जाऊ शकतं.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
'गुलिगत सूरज'ला सुप्रिया ताई अन् दादांचा फुल्ल पाठिंबा, बारामतीकर सूरज चव्हाणला व्होट करण्याचं आवाहन
Bigg Boss Marathi Grand Finale : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा फिनाले आठवडा सुरु आहे. लवकरच यंदाच्या सीझनचा विजेता मिळणार आहे. त्यासाठी बिग प्रेमी जनता आपल्या लाडक्या सदस्याला पाठिंबा देताना दिसत आहे. फक्त महाराष्ट्रातील जनताच नव्हे, तर सेलिब्रिटी आणि राजकारणी देखील आपल्या लाडक्या सदस्याला सपोर्ट करत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या लाडक्या सदस्याला पाठिंबा देत जनतेला त्याच्यासाठी व्होट करण्याचं आवाहन केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
OTT Release: ओटीटीवर यंदाचा विकेंड रोमांचक रिलीजनं भरणार, CTRL ते ट्राईबपर्यंत काय काय पाहता येईल?
OTT release: ओटीटी विश्व म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच. सध्या सणासुदीच्या काळात घरात बसल्या बसल्या आरामात चित्रपट पाहण्याची मौज काही औरच! त्यात भर म्हणून यंदाचा आठवडा थ्रिलर शो आणि चित्रपटांच्या रोमांचक सफरीवर घेऊन जाणार आहे. या आठवड्यात दमदार थ्रिलर चित्रपटांची पर्वणीच सिनेचाहत्यांना मिळणार आहे. अनन्या पांडेची मुख्य भूमिका असणारा CRTL हा मनोवैज्ञानिक थ्रिलर पट नेटफ्लिक्स वर रिलीज होणार आहे. zee 5, amazon प्राईम, सोनी लिव्ह आणि नेटफ्लिक्स वर हॉरर थ्रिलर आणि ड्रामा अशा सगळ्या शैलींच्या एंटरटेनमेंट रिलीजनं मनोरंजनाचा आठवडा रोमांचक जाणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Samantha-Naga Divorce : नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटासाठी 'ही' व्यक्ती कारणीभूत, मंत्र्याचा दावा; समंथाची कडक शब्दात टीका
Samantha-Naga Chaitanya Divorce : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी 2021 मध्ये घटस्फोट घेतला. आता दोघेही स्वत:च्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाबद्दल वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटासाठी बीआरएस नेते केटी रामाराव (KTR) जबाबदार असल्याचं वक्तव्य मंत्री सुरेखा यांनी केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...