एक्स्प्लोर

OTT Release: ओटीटीवर यंदाचा विकेंड रोमांचक रिलीजनं भरणार, CTRL ते ट्राईबपर्यंत काय काय पाहता येईल?

zee 5, amazon प्राईम, सोनी लिव्ह आणि नेटफ्लिक्स वर हॉरर थ्रिलर आणि ड्रामा अशा सगळ्या शैलींच्या एंटरटेनमेंट रिलीजनं मनोरंजनाचा आठवडा रोमांचक जाणार आहे. 

OTT release: ओटीटी विश्व म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच. सध्या सणासुदीच्या काळात घरात बसल्या बसल्या आरामात चित्रपट पाहण्याची मौज काही औरच! त्यात भर म्हणून यंदाचा आठवडा थ्रिलर शो आणि  चित्रपटांच्या रोमांचक सफरीवर घेऊन जाणार आहे. या आठवड्यात दमदार थ्रिलर चित्रपटांची पर्वणीच सिनेचाहत्यांना मिळणार आहे. अनन्या पांडेची मुख्य भूमिका असणारा CRTL हा मनोवैज्ञानिक थ्रिलर पट नेटफ्लिक्स वर रिलीज होणार आहे. zee 5, amazon प्राईम, सोनी लिव्ह आणि नेटफ्लिक्स वर हॉरर थ्रिलर आणि ड्रामा अशा सगळ्या शैलींच्या एंटरटेनमेंट रिलीजनं मनोरंजनाचा आठवडा रोमांचक जाणार आहे. 

Netflix वर अनन्या पांडेच्या CRTL चा थरार

ब्रेकअप च्या आठवणी पुसून टाकण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणारी नेलाची (अनन्या पांडे) थ्रिलर गोष्ट नेटफ्लिक्स वर 4 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. आताच्या काळातील तरुणांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टींवर अनन्या पांड्यापूर्वीही काम केलं आहे. CRTL हा मनोवैज्ञानिक थ्रिलर पट ही आजच्या काळातील तरुणांच्या आयुष्यावर असणारा डिजिटल इन्फ्लुएन्स दाखवणारा आहे. 

Zee 5 वर 'द सिग्नेचरचा ड्रामा 

Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनुपम खेर प्रमुख भूमिकेत असलेला द सिग्नेचर या चित्रपटाची मोठी चर्चा आहे. अरविंद नावाच्या एका निष्ठावंत पतीची ही कथा असून पत्नी कोमात गेल्यावर वाढत्या वैद्यकीय खर्चाचा सामना अरविंद कसा करतो, यावर हा चित्रपट आहे. या चित्रपटात मीना कुलकर्णी महिमा चौधरी आणि रणवीर शौरी यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. 

द ट्राईब: ॲमेझॉन प्राईमवर सिरीज 

ॲमेझॉन प्राईम वर सध्या 9 भागांच्या दट्राइब या वेब सिरीजची मोठे उत्सुकता आहे. भारताच्या एका मोठ्या गुंतवणूकदाराच्या आयुष्यावर भेटलेली ही कहाणी आहे. भारतातून लॉस एंजलिस मध्ये आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी गेलेल्या या गुंतवणूकदाराच्या आयुष्यात कसे गुंतागुंत निर्माण झाली. त्यातून त्यांना कसा मार्ग काढला यावर ही सिरीज आहे. 

मानवत हत्या: हत्याकांडाच्या तपासाचा थ्रीलर 

सोनी लिव्ह ऍप वर प्रदर्शित होणारी मानवत हत्या ही वेब सिरीज महाराष्ट्राच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारलेली आहे. सई ताम्हणकर सोनाली कुलकर्णी अशुतोष गोवारीकर यांच्या भूमिका असलेली ही वेब सिरीज सत्य घटनांवर आधारित आहे. 4 ऑक्टोबरला हा शो रिलीज होणार असून फसवणूक आणि मानवी स्वभावाच्या गडद पैलूंचा विचित्र शोध घेण्यात आलाय. 

हाऊस ऑफ स्पॉइल्स 

हाऊस ऑफ स्पॉइल्स हा ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणारा एक मनो वैज्ञानिक भयपट आहे. ज्यामध्ये एक शेफ ची स्वतःच रेस्टॉरंट उघडण्याची आकांक्षा भयंकर परीक्षेत बदलते. आत्मशंका आणि दुष्ट आत्म्याचा सामना करावा लागतो. हा थ्रिलर पट तीन ऑक्टोबरला ॲमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झाला आहे. सस्पेन्स आणि गुढतेचे मिश्रण असलेला हा भयपट प्रेक्षकांना खीळवून ठेवतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget