Raan Baazaar : 'रानबाजार'च्या टीझरला एका दिवसांत मिळाले 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज
Raan Baazaar : 'रानबाजार' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Raan Baazaar : वेबविश्वाला हादरवून टाकणारी 'रानबाजार' (Raan Baazaar) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या टीझरला एका दिवसांत 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
18 मे ला ट्रेलर होणार प्रदर्शित
'रानबाजार' या वेब सीरिजचा ट्रेलर 18 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत आहेत. 'रानबाजार'च्या ट्रेलरमध्येदेखील प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित झळकत आहेत. या दोन्ही टीझरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.
प्राजक्ता-तेजस्विनीने वेधले लक्ष
प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांनी या टीझरच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका दिवसात या टीझरला 10 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर या टीझरला प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिक्रिया मिळत आहेत. 20 मे पासून ही वेब सीरिज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिजित पानसे यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. टीझर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक आता वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
'रानबाजार' वेब सीरिज संदर्भात दिग्दर्शक अभिजित पानसे म्हणाले, "आज सर्वांच्या हातात बघायला ग्लोबल कॉन्टेन्ट आहे. तसं पाहिलं तर भाषेचा अडथळा कधीच पार झालाय. त्यामुळे एका सशक्त विषयाची मांडणी उत्तमरीत्या केली तर ती निश्चितच लोकांना आवडेल, सर्वदूर पोचेल असा विश्वास मला आणि अक्षयला वाटला. मग मराठीतल्या सर्वात सर्वार्थाने मोठ्या अशा ‘रानबाजार’ची निर्मिती झाली. यात राजकारण आहे, गुन्हेगारी आहे, याशिवाय थरारही आहे. अशा काही गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे, ज्या कदाचित आधी घडून गेल्या आहेत. हा एक वादग्रस्त आणि बोल्ड विषय आहे. अनेक गोष्टी 'रानबाजार' पाहिल्यावरच उलगडतील. जाणकारांच्या मते विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतच्या कॅान्टेन्टमध्ये हा सर्वोत्कृष्ट कन्टेंन्ट असणार आहे."
संबंधित बातम्या