(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TDM Trailer Release: रोमान्स आणि अॅक्शनचा तडका असलेला 'टीडीएम' चा ट्रेलर रिलीज; चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
'ख्वाडा', 'बबन' यांच्या यशानंतर दिग्दर्शक भाऊराव कराडे यांचा 'टीडीएम' (TDM) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
TDM Trailer Release: टीडीएम (TDM) चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. प्रेक्षक टीडीएम चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट पाहत होते. अॅक्शन आणि रोमान्सचा तडका असलेला हा चित्रपटात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'ख्वाडा', 'बबन' यांच्या यशानंतर दिग्दर्शक भाऊराव कराडे यांचा 'टीडीएम' हा चित्रपट 28 एप्रिलला सज्ज झालाय.
चित्रपटाचा ट्रेलर पाहून या चित्रपटात नवख्या कलाकारांनी काम केलं आहे, हे जराही जाणवत नाही. खेड्यापाड्यातील नायकाचा हजरजबाबीपणा, त्याची चालण्या बोलण्याची पद्धत हे सर्व पाहणं रंजक ठरतंय. ट्रेलरमध्ये नायक आणि नायिकेच्या रोमँटिक अंदाजाची झलक दिसत आहे. या ट्रेलरमधील डायलॉग्सने तर सगळीकडे कल्लाच केलाय. ट्रेलरमध्ये भाऊरावांची दमदार एन्ट्री पाहायला मिळतेय. ट्रेलरमधील 'लाथ मारशील तिकडे पाणी काढशील' या त्यांच्या डायलॉगने साऱ्यांच्या मनावर राज्य केलंय.
'ख्वाडा', 'बबन' चित्रपटाच्या यशस्वी निर्मितीनंतर भाऊराव कऱ्हाडे हे टीडीएम ही नवीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. अर्थात या कलाकृतीलाही प्रेक्षक, चाहते नक्कीच प्रतिसाद देतील, असा अंदाज लावला जात आहे.
'टीडीएम' चित्रपटातील 'एक फुल' आणि 'मन झालं मल्हारी'ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.'मन झालं मल्हारी' या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार वैभव शिरोळे याने पेलवली आहे. तर गाण्याच्या ओळी कुणाल गायकवाड आणि वैभव शिरोळे यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायिका आनंदी जोशी आणि वैभव शिरोळे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने या गाण्याला चारचाँद लावले आहेत.
पाहा ट्रेलर:
'चित्राक्ष फिल्म्स' आणि 'स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. या चित्रपटाच्या संवाद, पटकथा आणि कथेची जबाबदारी भिकू देवकाते, भाऊराव कऱ्हाडे, प्रो. किरण गाढवे यांनी सांभाळली आहे. तर संगीताची बाजू रोहित नागभिडे, ओंकारस्वरूप बागडे, वैभव शिरोळे यांनी पेलवली आहे. तर गायक नंदेश उमप, ओंकारस्वरूप, वैभव शिरोळे, प्रियंका बर्वे, आनंदी जोशी गाणी आपल्या सुमधुर स्वरात चित्रपटातील गाण्यांना चारचाँद लावलेत. संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार वीरधवल पाटील यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. 28 एप्रिल 2023 ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: