एक्स्प्लोर
आता तुमची मुलंही तैमूरसोबत खेळू शकणार!
केरळमधील लहान मुलांची खेळणी तयार करणाऱ्या एका कंपनीने तैमूरचा हुबेहूब बाहुला तयार केला आहे.
मुंबई : करिना कपूर खान आणि सैफ अली यांचा लाडका तैमूर हा समस्त बॉलिवूड कलाकार आणि चाहत्यांचा लाडका आहे. तैमूरचे फोटो पाहण्यासाठी अनेक चाहते सोशल मीडियाकडे डोळे लावून बसलेले असतात. तैमूरची लोकप्रियता इतकी आहे, की चिमुरडी मुलंही त्याच्यासोबत खेळण्यास उत्सुक आहेत. तुमच्या लहानग्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते.
केरळमधील लहान मुलांची खेळणी तयार करणाऱ्या एका कंपनीने तैमूरचा हुबेहूब बाहुला तयार केला आहे. अर्थात हे तैमूरचं 'अनधिकृत वर्जन' आहे, म्हणजेच करिना किंवा सैफकडून यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही.
या बाहुल्यांचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. नेव्ही ब्लू रंगाचं जॅकेट, पांढरा कुर्ता आणि निळी पँट असा तैमूरचा वेष आहे.
येत्या 20 डिसेंबरला तैमूर दोन वर्षांचा होईल. गेल्या वर्षी पतौडी कुटुंबाने त्यांच्या पूर्वापार घरात वाढदिवस साजरा केला होता. तैमूरचे असंख्य चाहते असून त्याच्या नावाने फेसबुक-इन्स्टाग्रामवर फॅन पेजेस सुरु आहेत.Meanwhile at a toy store in Kerala... pic.twitter.com/J2Bl9UnPdT
— Ashvini Yardi (@AshviniYardi) November 19, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement