एक्स्प्लोर

Mamata Banerjee Meet Swara Bhasker : स्वरा भास्करने घेतली ममता बॅनर्जींची भेट, म्हणाली...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान स्वरा भास्करने ममता दीदींचा भेट घेतली आहे.

Mamata Banerjee Meet Swara Bhasker : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईत ममता बॅनर्जी विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटत आहेत. नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने ममता दीदींची भेट घेतली आहे. स्वराने ममता दीदींसोबत अनेक विषयांवर चर्चादेखील केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishekh Banerjee) देखील त्यांच्यासोबत आहेत.

ममता दीदींना स्थानिक पातळीवर अनेक समस्या माहित असतात. ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यात अनेक कलाकारांनी ममता दीदींसोबत गप्पा मारल्या. समाजातील अनेक समस्यांवर चर्चादेखील केली. दरम्यान ममता दीदीदेखील व्यक्त झाल्या. नागरिकांना UAPA च्या नावाखाली तुरुंगात टाकले जाते. भीमा कोरेगाव प्रकरणातील अनेक जण कारागृहात आहेत. अशा अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली. स्वरा भास्कर म्हणाली,"लोकशाहीसाठी देशात एकाच पक्षाची सत्ता नसावी. इतर पक्षांनादेखील देशात ओळख मिळावी. त्यांची पकड मजबूत व्हावी. त्यामुळे मला असं वाटतं ममता दीदी मजबूत नेत्या आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते". 

ममता बनर्जी टीएमसीचा (Trinamool Congress) राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. ज्यामुळे त्या काही दिवसांपासून त्या देशभरातील राज्यांचा दौरा करत आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना काल (मंगळवारी) ममता बॅनर्जी यांनी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर आज ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. तर आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.  

ममता बॅनर्जी जाणार राजस्थान दौऱ्यावर 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान दौऱ्यावरही जाणार आहेत. या दौऱ्यात राजस्थानमधील पक्षाची ताकद वाढवण्यावर भर  देण्यात येणार आहे. गोवा,  मेघालय, त्रिपुरा आणि आसाममध्येही निवडणुकीत लढण्याचा निर्णय ममता बॅनर्जींनी घेतला आहे.  दरम्यान, सोमवारी कोलकातामध्ये झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या वर्किंग कमेटीच्या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय विस्ताराच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. बैठकीत हे ठरलं की, पक्ष घटनेत बदल करण्यापासून ते राष्ट्रीय स्तरावर भाजपला घेरण्यापर्यंत सर्व प्रकारची पावले उचलली जातील. वर्किंग कमिटीच्या सदस्यांची सध्याची संख्या 21 असून ती वाढवण्यात येण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. 

संबंधित बातम्या

अभिनेत्री स्वरा भास्कर लग्न न करताच होणार आई, उचललं मोठं पाऊल

Mamata Banergee : काँग्रेसला वगळून आघाडी करणार का, ममता बॅनर्जींसमोर शरद पवारांची 'सीधी बात', म्हणाले...

जब तक जियेंगे तब तक लढेंगे; ममता बॅनर्जींचा मुंबईत हल्लाबोल

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget