Sushmita Sen : सुष्मिता सेनने धरला मुलीसोबत ठेका , सोशल मीडियावर शेअर केला पॅरिसमधील खास व्हिडीओ
बाॅलीवूडगची अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिची मुलगी नुकत्याच एका ट्रिपसाठी पॅरिसला गेले होते. त्यावेळी तिने डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Sushmita Sen Video : बाॅलीवूडची (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) नुकतेच हाॅलिडे करता तिच्या मुलीसोबत पॅरिसला गेली आहे. तेथील तिचा आणि तिच्या मुलीचा डान्स करतानाचा व्हीडिओ तिने नुकताच इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यात ती आणि तिची मुलगी आयफेल टाॅवरच्या (Eiffel Tower) समोर डान्स करत आहे. हा व्हीडिओ तिच्या चाहत्यांना आकर्षित करत आहे. सुष्मिता ही नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. यावेळी सुष्मिताने काळ्या मिनी ड्रेसवर पांढऱ्या रंगाचे ब्लेझर घातले आहे आणि अलिशानेही पांढऱ्या पोशाख परिधान केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की, माझी मुलगी अलीशा लवकरच शिक्षणाकरता परदेशात जाणार आहे. मात्र अद्याप तिने अलीशा कोणत्या देशात शिकायला जाणार हे सांगितले नाही.
व्हीडिओ शेअर करत त्याखाली तिने लिहिले आहे, "परदेशात शिक्षणाला जाण्यापूर्वीची माझी मुलगी अलीशाची ही पॅरिसमधील पहिली ट्रिप. आयफेल टाॅवरच्या समोर आम्ही दोघींनी केलेला हा नाच मी कायम आठवणीत ठेवेन." हा व्हीडिओ (Video) चांगलाच व्हायरल (Viral) होत असून अनेकांनी या व्हीडिओवर कमेंट्स केल्या आहेत. सुष्मिता सेनचा हा सुंदर व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांची मनं उत्साहाने भरून आली आहेत. या व्हिडिओवर अनेक छान कमेंट देखील आल्या आहेत. एका चाहत्याने या व्हिडिओवर लिहिले की, "आई आणि मुलगी यांच्यातील प्रेम सर्वात अनोखे आहे." दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, "अलीशा काही वेळातच मोठी झाली आहे आणि आता ती देश सोडून परदेशात जात आहे." तर एकाने लिहिले आहे , "तुम्ही जगातल्या सगळ्यात सुंदर स्त्री आहात." तसेच एका डिजीटल क्रिएटरने लिहिले आहे, "तू खूप मुलींची प्रेरणा आहेस आणि आता तू एक आदर्श माता देखील आहेस. तुला आणि तुझ्या मुलीला खूप प्रेम."
सुष्मिता सेनचे आगामी प्रोजेक्ट्स
सुष्मिताच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच 'आर्या 3' मध्ये दिसणार आहे. अभिनेत्रीने आर्या 3 चे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय ती 'ताली' या वेबसिरीजमध्ये (Web-Series) दिसणार आहे. नुकतेच निर्मात्यांनी त्याचे पोस्टर रिलीज केले आहे. यात सुष्मिता सेन ट्रान्सजेंडर गौरी सावंतची भूमिका साकारणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
