एक्स्प्लोर

Priyanka Chopra : "फक्त हिप्स आणि बुब्स..."; भारतीय सिनेसृष्टीबद्दलचं प्रियांका चोप्राचं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत

Priyanka Chopra : बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणाऱ्या प्रियांका चोप्राच्या वादग्रस्त वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Priyanka Chopra : बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. बॉलिवूडसह अनेक हॉलिवूड सिनेमांत तिने काम केलं आहे. त्यामुळे अल्पावधीतच तिने जगभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आता तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती भारतीय सिनेसृष्टीबद्दल बोलताना दिसत आहे. पण वादग्रस्त वक्तव्याने नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलच ट्रोल केलं आहे. 

भारतीय सिनेसृष्टीबद्दल प्रियांका चोप्रा काय म्हणाली? 

प्रियांका चोप्राचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2016 मधला एमी पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा आहे. एक पत्रकार प्रियांकाला भारतीय सिनेसृष्टीबद्दल प्रश्न विचारत आहे. तसेच अभिनेत्रीला नृत्याची झलक दाखवण्यास सांगत आहे. त्यावर प्रियांका म्हणते,"भारतीय सिनेमांत फक्त हिप्स आणि बूब्सवर फोकस करण्यात येतं". त्यानंतर प्रियांका नृत्याची झलक दाखवते. 

In an Old video,from Emmy awards in 2016 Priyanka Chopra was asked by a reporter to show some indian movies dance moves. PeeCee than said Indian movies is are all about “ Hips and Boobs”.
by u/Left_Bee5657 in BollyBlindsNGossip

प्रियांका चोप्रा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

प्रियांका चोप्राचं वादग्रस्त वक्तव्य नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं नाही. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. एकेकाळी तूदेखील याच सिनेमांत काम केलं आहे आणि लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहेस, 2-4 हॉलिवूड सिनेमे केल्यानंतर प्रियांका मायदेशाला विसरली, भारतीय मनोरंजनसृष्टीने प्रियांकावर बंदी घालावी, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

'या' सिनेमाच्या माध्यमातून 'देसी गर्ल' करणार कमबॅक

प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे. फरहान अख्तरने प्रियांकाला विचारणा केली आहे. तिच्या आगामी सिनेमाचं नाव 'डॉन 3' असणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमात प्रियांकासोबत शाहरुख खान झळकणार असल्याची चर्चा आहे. 

प्रियांका चोप्रा 'द स्काई इस' या बॉलिवूड सिनेमात शेवटची दिसली होती. हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शोनाली बोसने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर नेटफ्लिक्सच्या 'द व्हाइट टायगर' या सिनेमात ती शेवटची दिसली. गेल्या काही दिवसांपूर्वी तिची 'सिटाडेल' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता तिच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

Priyanka Chopra: तुम्हालाही हवी बॉलीवूडच्या देसी गर्लसारखी फिगर? मग फॉलो करा तिचे फिटनेस सिक्रेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
Sensex : सेन्सेक्स 100000 च्या पार जाणार, सुपरफास्ट कमबॅक, 'या' संस्थेची सर्वात मोठी भविष्यवाणी
बुलेट ट्रेनच्या वेगानं सेन्सेक्स कमबॅक करणार, 1 लाखांचा आकडा पार करणार, कुणी केली सर्वात मोठी भविष्यवाणी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 13 March 2025 : ABP MajhaVikram Singh Pachpute Special Report : बोगस Paneer चा मुद्दा विधानसभेत, विक्रमसिंह पाचपुते आक्रमकSpecial Report | Santosh Deshmukh | ह्रदय हेलावणारे संतोष देशमुखांचे ते अखेरचे शब्द..Special Report | Krishna Andhale | नाशिकमध्ये 'सर्च', कृष्णा आंधळेचं 'ऑपरेशन'?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
Sensex : सेन्सेक्स 100000 च्या पार जाणार, सुपरफास्ट कमबॅक, 'या' संस्थेची सर्वात मोठी भविष्यवाणी
बुलेट ट्रेनच्या वेगानं सेन्सेक्स कमबॅक करणार, 1 लाखांचा आकडा पार करणार, कुणी केली सर्वात मोठी भविष्यवाणी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Embed widget