एक्स्प्लोर

Amit Sadh Struggle: वयाच्या 16 व्या वर्षी सोडलं घर, चार वेळा आयुष्य संपवण्याचा केला प्रयत्न; जाणून घ्या अमित साधची स्ट्रगल स्टोरी

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अमितनं (Amit Sadh)   त्याच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं.

Amit Sadh Struggle: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमित साध (Amit Sadh)  हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.  अमित साध  हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अमितनं त्याच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं. जाणून घेऊयात अमितच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...

एका मुलाखतीमध्ये अमित सांगितलं की, त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याला त्याच्या रंगामुळे लोकांशी बोलण्याचे धाडस होत नव्हते. त्याच्या पालकांनी कधीही त्याची काळजी घेतली नाही, त्यामुळे त्याचा स्वभाव देखील खूप चिडचिडा झाला होता. यामुळेच त्यानं वयाच्या 16 व्या वर्षी घर सोडले आणि चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला.

अमित हा अभिनेता होण्यापूर्वी एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. तिथे त्याला 900 रुपये पगार मिळत होता. त्यानंतर  त्याला 'क्यों होता है प्यार' या टीव्ही शोमध्ये आदित्य भार्गवची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेमुळे अमितला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने 'काय पो छे', 'सुलतान'यां सारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amit Sadh (@theamitsadh)

 अमित एका मुलाखतीमध्ये त्याच्या सुखी या आगामी मालिकेबाबत देखील सांगितलं. मला  वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत. पुढे जे काही येईल ते चांगले होईल असे वाटते.' सुखी या चित्रपटात अमितसोबत शिल्पा शेट्टी देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. अमित आणि शिल्पा यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रीथ: इंटू द शेडोस, बॅरट हाऊस, अवरोध या ओटीटी शोमध्ये देखील काम केलं. ब्रेथ: इनटू द शॅडोजमध्ये अमित हा पोलीस अधिकारी कबीर सावंतच्या भूमिकेत दिसला. अमितची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. ‘विक्टर’ , ‘द पुणे हायवे’ आणि ‘दुरंगा सीजन 2’ या सीरिजमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अमित साध हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. अमित हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देतो. इन्स्टाग्रामवर अमितला 1.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Anupam Kher: खिशात 37 रुपये घेऊन गाठली मुंबई, आज आहेत कोट्यवधींचे मालक; अनुपम खेर यांची स्ट्रगल स्टोरी जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Colors Marathi Mee Jinkun Ghein Saara: राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?
राजगुरू परिवारावर संकटाचे सावट, शांभवीचा खरा चेहरा उघड करण्यासाठी छवी सज्ज, 'मी जिंकून घेईन सारं' मालिकेत काय घडलं?
Sai Tamhankar Bol Bol Bol Rani Movie Song: सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी'चं पहिलं गाणं भेटीला; प्रेम, रहस्य आणि भावनांचा 'सुपरनोव्हा'
सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी'चं पहिलं गाणं भेटीला; प्रेम, रहस्य आणि भावनांचा 'सुपरनोव्हा'
Pravin Tarde on Deeol Band 2: 'देवावर सिनेमा बनवला म्हणून हिट?' प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले 'अशा वृत्तीच्या लोकांना...'
'देवावर सिनेमा बनवला म्हणून हिट?' प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले 'अशा वृत्तीच्या लोकांना...'
Kolkata Crime Case Munmun Datta: आधी रस्त्यात गाठलं, शरीराचे लचके तोडले अन् मग तलावात फेकलं, 12 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं, TMKOC फेम अभिनेत्रीचा संताप
आधी रस्त्यात गाठलं, शरीराचे लचके तोडले अन् मग तलावात फेकलं, 12 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं, TMKOC फेम अभिनेत्रीचा संताप

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Embed widget