Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतच्या 'त्या' फ्लॅटमध्ये नवीन भाडेकरू येणार; जाणून घ्या घरभाडं किती?
Sushant Singh Rajput Suicide Case : सुशांत सिंह राजपूतच्या 'त्या' फ्लॅटमध्ये आता नवीन भाडेकरू येऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे.
Sushant Singh Rajput Suicide Case : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला अडीच वर्षे लोटली असली तरी आजही तो चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. त्यांचं निधन झालं तेव्हा तो वांद्रे परिसरातील एका आलिशान फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. गेली अनेक वर्ष या फ्लॅटमध्ये कोणीही राहायला तयार नव्हतं. अखेर अडीच वर्षानंतर या फ्लॅटमध्ये नवीन भाडेकरू येऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
सुशांत सिंह राजपूतचे ज्या फ्लॅटमध्ये निधन झाले तो फ्लॅट अडीच वर्ष रिकामाच होता. 2020 साली या फ्लॅटमध्येच सुशांतने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्या घरात कोणीही राहायला तयार नव्हते. मालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
सुशांत सिंह राजपूतच्या त्या फ्लॅटसंदर्भात आता एक नवी अपडेट समोर आली आहे. 'त्या' फ्लॅटमध्ये आता नवीन भाडेकरू येऊ शकतात. सध्या मालक आणि भाडेकरू यांच्यात यासंदर्भात करार सुरू आहे. अभिनेत्याच्या मृत्यूला बराच काळ लोटल्याने नवीन भाडेकरू त्या फ्लॅटमध्ये राहायला तयार झाले आहेत.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूत ज्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता त्या फ्लॅटचे मालक परदेशात राहतात. गेल्या काही दिवसांपासून ते त्या घरासाठी नवीन भाडेकरू शोधत होते. नवीन भाडेकरूला त्या घरासाठी दरमहा सुमारे पाच लाख रुपये भाडं द्यावं लागणार आहे.
सुशांत सिंह राजपूतने हा फ्लॅट सुमारे तीन वर्षांसाठी भाड्याने घेतला होता. डिसेंबर 2022 पर्यंत तो त्या घरात राहणार होता. त्या फ्लॅटमध्ये सुशांत रिया चक्रवर्ती आणि सिद्धार्थ पिठाणी यांच्यासोबत राहत होता.ब्रोकरने गेल्या काही दिवसांपूर्वी सुशांतच्या घराचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं,"हा सी-फेसिंग फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहे. या फ्लॅटची किंमत दरमहा पाच लाख रुपये आहे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला अडीच वर्ष होऊनही हा फ्लॅट रिकामाच आहे. कोणीही या घरात राहायला तयार नाही".
View this post on Instagram
सुशांत सिंह राजपूतच्या आकस्मित मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आजही त्याच्या आठवणीत चाहते भावूक होतात. आज तो या जगात नसला तरी चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आत्महत्या असल्याचं म्हटलं होतं. पण त्याच्या कुटुंबियांनी त्याची हत्या झाल्याचं म्हटलं होतं.
संबंधित बातम्या