सनी लिओनी कॉलेजच्या ‘मेरिट लिस्टमध्ये’ थेट पहिल्या क्रमांकावर
कोलकाताच्या आशुतोष महाविद्यालयाच्या मेरिट लिस्टमध्ये सनी लिओनीचं नाव झळकल्यानं सनी लिओनी पुन्हा चर्चेत आली.
मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी कोणत्या ना कोणत्या कारणांमध्ये कायम चर्चेत असते. यावेळीही ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ती चक्क कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये आलेल्या प्रथम क्रमांकामुळे.
कोलकाताच्या आशुतोष महाविद्यालयाच्या मेरिट लिस्टमध्ये सनी लिओनीचं नाव झळकल्यानं सनी लिओनी पुन्हा चर्चेत आली. महाविद्यालयानं BA ( honours)च्या प्रवेशाची पहिली मेरीट लिस्ट जाहीर केली. वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली ही मेरीट लिस्ट पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या लिस्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचं नाव प्रथम क्रमांकावर होतं. तिच्या नावासोबत अर्जाचा आयडी आणि रोल नंबरही होता. तिला बारावीच्या परिक्षेत चार विषयांत पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहे.
मेरिट लिस्टची कॉपी व्हायरल झाल्यानंतर त्यावर सनी लिओनीने सुद्धा ट्वीट करत मजा घेतली आहे. ती म्हणते “पुढच्या सेमिस्टरला कॉलेजमध्ये नक्की भेटू, आशा करते तुम्ही माझ्याच वर्गात असाल".
See you all in college next semester!!! Hope your in my class ;) 😆😜
— sunnyleone (@SunnyLeone) August 28, 2020
मेरिट लिस्ट यादीचा फोटो इतका व्हायरल झाला की, महाविद्यालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. सनी लिओनीच्या नावानं अर्ज करुन कोणीतरी जाणीवपूर्वक खोडकरपणा केला असावा, असे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. अॅडमिशन विभागाला त्यात दुरुस्ती करण्यास सांगितले असून याचा तपास केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
संबंधित बातम्या :Bollywood actor Sunny Leone's name ‘mischievously’ appears on merit list of a Kolkata college, says official
— Press Trust of India (@PTI_News) August 27, 2020