एक्स्प्लोर
कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तर
मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर यांच्यातील वाद वाढतच आहे. दोघांमधील भांडणाच्या वृत्तानंतर सुरुवातीला कपिल शर्माने स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर माफी मागितली. आता सुनिल ग्रोव्हरने कपिल शर्माला उत्तर दिलं आहे.
"पाजी, नकळत मी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तू जाणतोच. मी पण दु:खी आहे. तुझ्यासाठी कायम प्रेम आणि आदर असेल," असं ट्वीट कपिल शर्माने केलं होतं.
https://twitter.com/KapilSharmaK9/status/843873502717333504
आता सुनिल ग्रोव्हरचं उत्तर आलं आहे. त्याने ट्विटरवर कपिल शर्माला मेंशन करुन उत्तर दिलं आहे.
https://twitter.com/WhoSunilGrover/status/844005345534099456
सुनिल ग्रोवरने लिहिलं आहे की, "भाई जी, होय, तू मला फारच दुखावलं आहेस. तुझ्यासोबत काम करुन मी फार शिकलो. तुला केवळ एक सल्ला देतो, जनावरांशिवाय माणसांनाही आदर देण्यास सुरुवात कर.
सगळेच तुझ्यासारखे यशस्वी नाहीत. तुझ्यासारखे टॅलेंटेडही नाहीत. जर सगळेच तुझ्याएवढेच टॅलेंटेड झाले तर तुझी कदर कोण करेल? त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचीही जाणीव असू दे.
आणि हो, जर कोणी तुझी चूक दाखवत असेल तर त्याचा अपमान करु नको. शिवाय काही महिला ज्यांना तुझ्या स्टारडमशी काहीही देणं-घेणं नाही, त्यांच्यासमोर अभद्र भाषा वापरु नको. त्या केवळ योगायोगाने, तुझ्यासोबत प्रवास करत आहेत.
हा तुझा शो आहे आणि तू कोणालाही, कधीही शोमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतोस हे जाणवून दिल्याबद्दल तुझे आभार. तू तुझ्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ आहेस. पण देवासारखं वागू नको. स्वत:ची काळजी घे. तुला यश आणि प्रसिद्धी मिळो यासाठी माझ्या शुभेच्छा."
दरम्यान, कपिल शर्माने सुनिल ग्रोव्हरला विमानात मारहाण केल्याचं वृत्त आहे. स्पॉटबॉय डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल शर्मा आपल्या संपूर्ण टीमसह ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबर्नमध्ये शोसाठी गेला होता. हा शो संपवून हे सर्वजण ऑस्ट्रेलिया ते मुंबई असा इकॉनॉमी क्लासने प्रवास करत होते. यावेळी कपिलनं दारुच्या नशेत सुनिल ग्रोवरला मारहाण केली. या मारहाणीवेळी कपिल शर्माने सुनिल ग्रोवरसाठी अपमानास्पद भाषेचाही वापर केल्याचं स्पॉटबॉयने म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट
…म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement