
Hunter : अन्ना इज बॅक! सुनील शेट्टीच्या 'हंटर'चा ट्रेलर रिलीज, पुन्हा दिसणार अॅक्शन मोडमध्ये
Suniel Shetty : सुनील शेट्टीच्या आगामी 'हंटर' (Hunter) या वेबसीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Suniel Shetty Hunter Web Series : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) गेल्या काही दिवसांपासून 'हेरा फेरी 3'मुळे चर्चेत आहे. पण आता आणखी एका वेगळ्या गोष्टीमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. सुनील शेट्टीच्या आगामी 'हंटर' (Hunter) या वेबसीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'हंटर'चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. थरार-नाट्य आणि अॅक्शनचा तडका असलेला हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या ट्रेलरमध्ये सुनील शेट्टी अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. 'हंटर' या सीरिजमध्ये सुनील शेट्टी एसीपी विक्रम सिंहच्या भूमिकेत झळकणार आहे.
'हंटर' या वेबसीरिजमध्ये सुनील शेट्टी, राहुल देव आणि ईशा देओल महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या ट्रेलरमध्ये ईशा देओलच्या भूमिकेची झलकदेखील पाहायला मिळणार आहे. 'हंटर-टूटेगा नहीं तोडेगा' असे ट्रेलरमधील डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. ही सीरिज प्रेक्षकांना प्राइम व्हिडीओवर 22 मार्चपासून पाहता येणार आहे.
View this post on Instagram
सुनील शेट्टीने शेअर केला 'हंटर'चा ट्रेलर (Suniel Shetty Shared Hunter Trailer)
'हंटर' या वेबसीरिजचा ट्रेलर सुनील शेट्टीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत सुनीलने खास कॅप्शनदेखील लिहिलं आहे. त्याने लिहिलं आहे, एसीपी विक्रमच्या जगात तुमचं स्वागत आहे. माझ्या जगात काही तुटत नसतं.. मी तोडत असतो. माझी नवीन सीरिज नक्की 'हंटर' नक्की पाहा". सुनील शेट्टीने शेअर केलेल्या या ट्रेलरवर 'किंग इज बॅक', अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
सुनील शेट्टीने आजवर अनेक विनोदी सिनेमांत काम केलं आहे. पण त्याच्या चाहत्यांना त्याचा अॅक्शन मोड जास्त आवडतो. 'हंटर'मध्ये सुनील शेट्टी पोलीस अधिकारी असला तरी रातोरात मर्डरर कसा होतो हे दाखवण्यात आले आहे. तर ईशा देओल पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. या सीरिजमध्ये सुनील आणि ईशासह बरखा बिश्ट, राहुल देव, मिहिर आहूजा, टीना सिंह, चाहत तेजवानी, करणवीर शर्मा, सिद्धार्थ खेर, गार्गी सावंत आणि पवन चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. प्रिन्स धीमान आणि आलोक बत्राने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.
संबंंधित बातम्या
Hera Pheri 3: 'हेरा फेरी 3' च्या शूटिंगला सुरुवात; बाबू भैय्या, श्याम आणि राजू येणार प्रेक्षकांच्या भेटीस
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
